फुलवळ येथील से.स.सोसायटी च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने घेतली खा.प्रतापराव पा. चिखलीकर यांची भेट..

फुलवळ(धोंडीबा बोरगावे).

कंधार तालुक्यातील फुलवळ येथे नुकतेच सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळाने नुकतीच नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची सदिच्छा भेट घेतली आणि गावातील काही समस्या मांडून गावविकासासाठी विविध कामांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी लेखी निवेदन देऊन विनंतीपूर्वक मागणी केली.

ठिकठिकाणी सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुका अटीतटीच्या होत असतांनाच कंधार तालुक्यातील फुलवळ येथील सुज्ञ आणि जाणकार नागरिक व मतदारांनी सदर निवडणुकीत सर्व हेवेदावे बाजूला सारत सर्वानुमते एकाच पॅनल च्या एकूण १३ सदस्यांना बिनविरोध निवडून दिले असल्याने सर्वत्र एकच चर्चा ऐकायला मिळते ती म्हणजे राजकारणात एवढे मुरलेले गाव आणि गावकरी एकत्र येऊन सेवा सहकारी सोसायटी निवडणूक न होऊ देता तेराच्या तेरा सदस्य बिनविरोध निवडून दिल्याने आता नक्कीच गाव एकवटल्याचे द्योतक दिसून येत असून यापुढेही होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ही एकी अशीच टिकून ठेवतील का ? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

याच बिनविरोध संचालक मंडळातुन चेअरमन म्हणून दत्तात्रय डांगे तर व्हाईस चेअरमन म्हणून संग्राम मुंडे यांची ही तशीच बिनविरोध निवड करण्यात आली. याच बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळाबरोबरच स्थानिक जेष्ठ नागरिक , ग्राम पंचायत चे सरपंच प्रतिनिधी , माजी सरपंच , माजी उपसरपंच , काही सामाजिक कार्यकर्ते यांनी नुकतेच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेतली व गावातील काही समस्या मांडत त्यावर आपण तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली.

यात प्रामुख्याने जुनेगावठाण फुलवळ येथे कार्यरत असलेले सेवा सहकारी सोसायटी च्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा , गावातील प्रवेशद्वार ( वेस ) बांधकाम करून त्यावर पाणी पुरवठ्यासाठी एक टाकी उभारावी , फुलवळ येथील जाज्वल देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र महादेव मंदिर ला तीर्थक्षेत्र चा ‘क’ दर्जा मिळवून देऊन येथील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. आणि विशेष करून फुलवळ येथे गेल्या सहा महिन्यात जवळपास तीस च्या वर विद्युत पुरवठा चे ट्रान्सफार्मर जळाले असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे आशा समस्या निर्माण होत आहेत , तेंव्हा त्यासाठी संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन त्यात सुधारणा करावी अशी विनंती केली.

 

यावेळी बोलताना खासदार चिखलीकर यांनी उपस्थितांच्या समस्या ऐकून घेत त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर फुलवळ साठी निधी व इतर कामांसंदर्भात उपाययोजना करू असा विश्वास दिला. यावेळी माजी जि.प. सदस्य बाबुराव पाटील गिरे , चेअरमन दत्ता डांगे , व्हाईसचेअरम संग्राम मुंडे , सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे , संभाजी मंगनाळे , माजी सरपंच बालाजी देवकांबळे , मुंडेवाडी चे सरपंच ज्ञानोबा मुंडे , शिवदास सोमासे , व्यंकटी शेळगावे , विश्वांभर बसवंते , उद्धव देवकांबळे , हाजीसाब शेख , संतोष मंगनाळे , मारोती जेलेवाड , अमृता मंगनाळे , विठ्ठल तुप्पेकर , शादुल शेख , आनंदा पवार , धोंडीबा बोरगावे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *