कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील मौजे बाभुळगाव येथे महात्मा गांधी तंटामुक्ती भवनचे लोकार्पण व 5 लक्ष रुपयाच्या सि.सि.रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महीला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांच्या हस्ते फित कापुन लोकार्पण करण्यात आले.
यावेळी *सौ.आशाताई शिंदे यांचा बाभुळगाव गावकरी मंडळी यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.* यावेळी सौ.आशाताई शिंदे यांनी लोकार्पण केलेल्या सि.सि.रस्त्याची स्वतः पाहणी केली.
याप्रसंगी सौ.आशाताई शिंदे आपल्या भाषणात म्हणाल्या की, आमदार श्यामसुंदरजी शिंदे हे .लोहा /कंधार मतदारसंघाच्या विकासासाठीच इथे आलेले आहेत. यापुढेही असाच विकासाच्या माध्यमातून बदल घडवत राहतील व बाभुळगावच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध राहतील असे सौ.आशाताई म्हणाल्या,
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ.मुदरका रामदास गिते सरपंच बाभुळगा ,ज्ञानेश्वर चोंडे साहेब क्रषी उत्पन्न बाजार समिती कंधार माजी सभापती, माधवराव पा.घोरबांड,सौ.शोभा जेलेवाड उपसरपंच, किमराव वामनगुंडे,संग्राम बोरोळे (पो.पा.) रितेश उरुले,अंगत केंद्रे सर,घोरपडे साहेब ग्रामसेवक,माधव वाघमारे,बाळा पा. मंगनाळे,व गावकरी मंडळी याप्रसंगी उपस्थित होते.