पुणे ; प्रतिनिधी
दिनांक 18/04/2023 दुपारी 12.00 वाजेपासून आज सकाळ 07.35 पर्यंत एकूण 3,65,778 विद्यार्थी आधार कडून तपासण्यात आले असून 1,21,997 विद्यार्थी आधार वैध आढळून आले आहेत.अवैध असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कितीही वेळा डेटा प्रोसेस केला तरी अवैधच येणार आहे. जोपर्यंत अवैध( *invalid*) असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे *इ -आधार कार्ड डाउनलोड* करून आधार कार्ड वर असलेली माहिती पुन्हा स्टुडन्ट पोर्टलमध्ये अपडेट करून *save & update* केल्यानंतर *validate* बटनवर क्लिक केल्यानंतर आधार वैध होण्याचे प्रमाण वाढणार आहे.
दिनांक 13.4.2023 रोजी शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडेशन करण्यासाठी प्रोसेस केले असता सरासरी *27%* च विद्यार्थ्यांचे आधार कार्ड valid असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आज दिनांक 18/04/2023 रोजी हेच प्रमाण *34%* झाल्याचे दिसून येत आहे.यावरून असे दिसून येते की शाळांकडून स्टुडन्ट पोर्टलमध्ये नोंद करण्यात येत असलेल्या *विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड ची माहिती कदाचित*व्यवस्थित नोंद केली जात नसावी किंवा शाळेत पालकांनी दिलेले कार्ड अध्यायावत नसावे अशा शक्यता दिसून येतात* त्यामुळे शाळांनी ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड यापूर्वी *invalid* म्हणून शाळेच्या लॉगिनला दिसत असतील अशा *सर्व विद्यार्थ्यांच्या* बाबतीत शाळांनी वेळ न दडवता *इ-आधार कार्ड डाउनलोड* करून घेतल्यास अशा *ई-आधार कार्ड वरील माहिती स्टुडन्ट पोर्टलमध्ये नोंद केल्यानंतर validचे प्रमाण जवळपास 100% दिसून येईल. याचे कारण आधार प्रमाणिकरणाकडे असलेला डेटाच ई-आधार कार्डमध्ये नजीकचा डेटा आल्याने विद्यार्थ्यांचे व्हॅलिडचे प्रमाण निश्चितच वाढताना दिसेल* ,त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे की शाळांमध्ये Invalid आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शाळांनी ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवर पालकाचा मोबाईल नंबर असेल अशा पालकांना शाळेत बोलावून घेऊन अथवा ओटीपी देण्याची विनंती करून UIDAIच्या संकेतस्थळावर भेट देऊन शाळेतच UIDAIच्या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांची इ -आधार कार्ड डाउनलोड करून घेता येतील व अशी माहिती स्टुडन्ट पोर्टलवर view & update करून save केल्यास व त्यानंतर validate बटन वर क्लिक करून कार्यवाही केल्यास कमी वेळात आधार कार्ड वैध होण्याचे प्रमाण वाढेल.