पानभोसी केंद्रस्तरीय शाळापुर्व तयारी  प्रशिक्षण संपन्न

कंधार ; प्रतिनिधी

 केंद्र पानभोसी तां कंधार अंतर्गत जि प प्रा शाळा वंजारवाडी येथे जिल्हापरिषेद नांदेड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या सूचनेनूसार केंद्रपानभोसी ता.कंधार येथे केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी मेळावा प्रशिक्षण उत्साहात संपन्न. पानभोसी केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी मेळाव्याचे नियोजन केंद्राचे केंद्रप्रमुख उध्दव पा सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जि प प्रा शा वंजारवाडी येथे करण्यात आले होते सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीताने झाली तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत कु.वैभवी गिते,शिवानी केंद्रे ,सुप्रिया गिते व राजश्री केंद्रे या विद्यार्थीनीनी स्वागतगीताने केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष पानभोसी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. उध्दव पा सुर्यवंशी हे होते प्रमुख पाहुणे सरपंच श्री परमेश्वरराव गिते ,शालेय व्य स अध्यक्ष श्री सुदाम केंद्रे , केंद्रिय प्रा शाळेचे मुख्याद्यापक श्री संभाजीराव लुंगारे मुख्याद्यापक विठ्ठल दगडगावे,माधव भालेराव बालाजी गवळे सर होते.तसेच कार्यक्रमासाठी केंद्र अंतर्गत सर्व मुख्याध्यापक सर्व शाळेचे शिक्षक व केंद्रांतर्गत सर्व अंगणवाडी ताई व मदतनीस उपस्थित होते. या प्रशिक्षणात शाळापूर्व तयारी मेळाव्याची गरज,आवश्यकता काय व मेळाव्याचे आयोजन शाळा स्तरावर कशा प्रकारे करावे यांची माहिती केंद्र सुलभक लोहबंदे एस एच व सौ सालमोटे मॅडम यांनी डेमोच्या माध्यमातुन सविस्तर दिले.हा मेळावा घेऊन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवावी विद्यार्थी आनंदी उत्साही वातावरणात जि प शाळेमध्ये प्रवेश घेतले पाहिजे आनंदाने टिकले पाहिजे व गुणवंत झाले पाहिजे याचे सविस्तर मार्गदर्शन केंद्रप्रमुख उध्दव पा सुर्यवंशी सर यांनी केले. सात प्रकारच्या स्टॉलची मांडणी करून बालकांची शाळापूर्व तयारी कशी करून घ्यावी हे या प्रशिक्षणात सर्व मुख्याध्यापक शिक्षक व अंगणवाडीताईंना प्रात्यक्षिकासह सांगितले. प्रशिक्षणात दिंडी काढून दवंडी देत घोषणा देत प्रवेश पात्र विद्यार्थ्याचे प्रात्यक्षिक प्रवेश देण्यात आला आदर्श शिक्षक श्री लोहबंदेसर सौ सालमोटे मॅडम यांनी ” मेळाव्याला चला तुम्ही मेळाव्याला चला शाळा प्रवेशाच्या मेळाव्याला चला ” हे शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे गीत प्रभात फेरी द्वारे सादर केले, सुंदर रांगोळी च्या साह्याने शाळापूर्व तयारी प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली .या कार्यक्रमास सरपंच म्हणून सौ अनिता दाणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून सौ गोदावरी वडजे मॅडम संभाजीराव लुंगारे सर तर विद्यार्थी म्हणून नांमदेव शिनगारे सर गोविंद गितेसर ,थगनर मॅडम मन्मथ पांडागळे सर,नागोराव लुंगारे सर, विष्णूदास मानेसर, भुसकटे मॅडम दिपाली सुर्यवंशी मॅडम तर विद्यार्थ्यांचे पालक म्हणून पेठकरमॅडम , आनंदा कदम सर बोधगीरे मॅडम क्षमता तपासणीसाठी शिंदे सर,पांचाळ सर, कल्याणकस्तुरे सर,कुलकर्णी मॅडम ,गुंडाळे मॕडम ,शेख मॕडम सालमोटे मॕडम ,देशमुख मॕडम ,उत्तरवार मॅडम ,बेळकोणेसर ,सुर्यकांत बोंबले अतुल कांबळे सर घोडके मॅडम सर्व अंगणवाडी सेविका ताई ,श्री बालाजी गवळेसर, सुर्यकांत लोहबंदेसर, विष्णूदास मानेसर यांनी अतिशय चांगली भूमिका निभावली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुर्यकांत लोहबंदे सर व आभार प्रदर्शन विष्णूदास माने सर यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *