कंधार ;(माधव गोटमवाड)…
मनोज ( मालक ) धर्मापुरीकर यांच्या मार्गदर्शना मुळे ग्रामपंचायत सरपंच की नंतर सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची व व्हॉइस चेअरमन पदाची निवड बिनविरोध !
मजरे धर्मापुरी या गावाचे एकोपा राखण्यासाठी धर्मापुरीकर ( मालक ) मंडळीचा गेल्या 50 – 60 वर्षापासून नेहमी सकारात्मक प्रयत्न राहिलेला आहे. आणि त्याच गोष्टी आता पुढे विरहित चालू ठेवण्यासाठी श्री रवी ( मालक ) धर्मापुरीकर, ऍड प्रा. मनोज ( मालक ) धर्मापुरीकर, सुनील ( मालक ) धर्मापुरीकर, प्रसाद ( मालक ) धर्मापुरीकर, विर्जित ( मालक ) धर्मापुरीकर हे चालवत आहेत.
सर्व मालक मंडळी मुळे धर्मापुरीचे सर्व रहिवासी एकोप्याने राहत आहेत.
तसेच गावातील कोणत्याही गोष्टीचा सर्वानुमते निर्णय घेतला जातो. कोणालाही डावलले जात नाही हि मालक मंडळीची हि एक आगळी वेगळी खासियत राहिलेली आहे. त्याच एक उदाहरण म्हणजे 2 वर्षापूर्वी धर्मापुरीची ग्रामपंचायत ( सरपंच ) ॲड प्रा. मनोज ( मालक ) धर्मापुरीकर यांच्या पुढाकारमुळे बिनविरोध काढली आणि काल सोसायटीचं चेरमनपद हि बिनविरोध काढलं आणि चेरमन पदी श्री सुधाकर नारायण लोखंडे पाटील यांना सर्वानुमते बिनविरोध निवड केली . तसं पहिलं तर श्री सुधाकर नारायण लोखंडे पाटील हे या अगोदर 1990 ते 2015 असं एकंदरीत 25 वर्षे बिनविरोध चेअरमन पदी होते. आता पुन्हा त्यांच्या कामाची पावती आणि मालक मंडळी व गावाकऱ्याचा पुढाकार त्यामुळे ते पुन्हा काल सहाव्यादा चेरमन पदी विराजमान झाले.
विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका म्हटलं, की तो त्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पायाच समजला जात होता. शेतकऱ्यांना आपल्या गावातच आर्थिक मदत मिळावी लहान मोठ्या प्रमाणात विविध कार्यकारी सोसायट्या या निर्माण झाल्या .
काल, ( दिनाक 19 एप्रिल ) मजरे धर्मापुरी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री सुधाकर नारायण लोखंडे तर व्हाइस चेअरमनपदी श्री निवृत्ती रघुनाथ आमलापुरे यांची निवड बिनविरोध करण्यात आली .
तसेच
संचालकपदी श्री. बाळकृष्ण अनंतराव धर्मापुरीकर, श्री. भगवान मारोती विश्वासराव, श्री.आनंदा गुंडेराव तोंनगे, श्री.जयवंता कोंडीबा पंढरे,श्री. मनोहर पांडुरंग फुलारी, श्री.बालाजी बापूजी पंढरे , श्री.बालाजी बापूराव लोखंडे, श्रीमती चंद्रकला मनोहर जाकापुरे, श्रीमती लक्ष्मीबाई भुजंगराव पंढरे, श्री.व्यंकटी रानबा इंगळे,श्री. उद्धव बापूराव जाधव यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झालेली आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चव्हाण साहेब उपस्थित होते तसेच सेवा सहकारी सोसायटी धर्मापुरी सचिव जोंधळे साहेब उपस्थित होते.
यावेळी गावातील उपस्थित श्री भुजंगराव पंढरे ( तंटामुक्ती अध्यक्ष ) श्री शिवदास विश्वासराव( मा. चेअरमन) , श्री बळी पंढरे, श्री मोहन पंढरे, सरपंच प्रतिनिधी श्री केशव इंगळे ,पोलीस पाटील श्री माधव पिटलवाड ,श्री शेषराव विश्वासराव ,श्री व्यंकटी पंढरे, श्री सूर्यकांत अमलापुरे ( मा सरपंच ) ,श्री लक्ष्मण पंढरे, श्री परमेश्वर अमलापुरे, श्री दादाराव पाटील लोखंडे, श्री गजानन जाधव ,श्री संभाजी लोखंडे ,श्री रामेश्वर लोखंडे पाटील ( कार्यकारी संपादक – दै चालु वार्ता ) ,श्री रामराव आमलापुरे, श्री निवृत्ती सूर्यवंशी, श्री किशन जाधव ,श्री मारुती विश्वासराव, श्री भानुदास लोखंडे,श्री रामेश्वर महाराज स्वामी, श्री कलबा पाटील पंढरे यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेअरमनपदी श्री सुधाकर नारायण लोखंडे पाटील तर व्हाइस चेअरमनपदी श्री निवृत्ती रघुनाथ आमलापुरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.