ग्रा.प. कार्यालय वर्ताळा येथील सरपंच पदी सौ. निर्मला आगलावे यांची बिनविरोध निवड

मुखेड: तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय सरपंचपदी सौ. निर्मला उर्फ विमल आनंदराव आगलावे यांची सरपंच पदी तर उपसरपंच पदी सौ. सावित्राबाई नामदेव राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालय वर्ताळा येथील सरपंच व उपसरपंच पदाचा दोन वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे सरपंच व उपसरपंच रिक्त झाले होते. आज दिनांक 10 एप्रिल सोमवारी निवडणूक घेण्यात आली असून सरपंच पदासाठी सौ. निर्मला आगलावे तर उपसरपंच पदासाठी सौ. सावित्रीबाई राठोड यांचा एकेक अर्ज आल्यामुळे त्यांना निवडणूक नर्वाचन अधिकारी तथा नायब तहसीलदार एन.एस. भोसीकर साहेब यांनी सरपंच व उपसरपंचाची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी नवनिर्वाचित सरपंच व सरपंच यांचा हनुमान मंदिराच्या प्रांगणात भव्य सत्कार केला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर, शेषराव गुरुजी डावकरे, सुधीर राठोड, ग्रा.प. सदस्या तथा माजी सरपंच सौ.शोभाबाई शेळके, माजी उपसरपंच सौ.रंजना राठोड,
रवी जायभाये, अनिल वाघमारे, सौ. भारतीताई गजगे, सौ. मिनाबाई केरुरे, भगवान शेळके यांच्यासह तलाठी बालाजी चव्हाण, ग्रामसेवक चंद्रकांत गोंदलवाड, सरपंच पती आनंदराव आगलावे, नामदेव राठोड शिवाजी गुरुजी डावकरे, दादाराव आगलावे, भगवानराव जायेभाये, मधुकर पाटील कागणे, एम.टी. गायकवाड, राजू केरुरे, देविदास गुरुजी डावकरे, रमेश डावकरे, बबलू कागणे, शिवाजी राठोड, हिरामण शेळके, शेषराव उळागडे, भाऊसाहेब आगलावे, गोविंद डावखरे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच पती आनंदराव आगलावे हे कुशाग्रह बुद्धीचे व आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते असल्यामुळे वर्ताळा येथील उर्वरित राहिलेल्या विकासची कामे मार्गी लागतील अशा अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत. यावेळी आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश डावखरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *