भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून महात्मा बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते.
कर्नाटकाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात महात्मा बसवेश्वरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. आद्य समाज सुधारक तसेच कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे आणि वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी थोर विभुती महात्मा बसवेश्वर.कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी नावाच्या छोट्याशा खेडेगावात आई मादलंबिका व वडील मादरस या थोर दांपत्याच्या पोटी महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला.
धर्म, समाज, तत्त्वज्ञान, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष महात्मा बसवेश्वर समाजसुधारकांच्या यादीतही यांचे पहिले स्थान आहे. म्हणूनच त्यांना आद्य भारतीय समाजसुधारक, क्रांतीयोगी व युगपुरुष मानले जाते.लहानपणापासूनच बसवेश्वरांनी कर्मठ रूढी-परंपरांना तीव्र विरोध केला. जातीभेद, अस्पृश्यता या गोष्टी त्यांना अजिबात आवडत नसत. वयाच्या आठव्या वर्षी ज्ञानप्राप्तीसाठी ते घराबाहेर पडले. महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा येथे त्यांनी तब्बल ३१ वर्षे वास्तव्य केले होते.
बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली, असे सांगितले जाते.धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण या कर्नाटकातील प्रदेशात आले. लिंगायत समाज बसवेश्वरांना शिववाहन नंदीचा अवतार मानतात. बसव, बसवाण्णा, बसवराज अशा नावांनी ते प्रसिद्ध होते.आपल्या भारताचा इतिहास तसा खूपच रंजक आणि गौरवशाही राहिलेला आहे. अश्या इतिहासात अनेक समाजसुधारक, संत,युगपुरुष,महात्मा होऊन गेले. अश्या महापुरुषांची आजही ह्या जगाला गरज भासत राहते कारण त्यांनी केलेले कार्य है सहज नव्हते.
महात्मा बसवेश्वरांचा लिंगायत धर्म प्रामुख्याने दलित संवेदनेवर आणि मानव जातीच्या तत्वावर आधारलेला आहे. बसवेश्वर पहिले क्रांतिकारी धर्मविचारक होते. ‘ओम नमः शिवाय’ हा षडक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला महिलांना मुक्तीचे पंख देणारे भारतातील समतेचे जनक म्हणून बसवेश्वरांच्या विचाराकडे पाहता येईल.बाराव्या शतकातही एकविसाव्या शतकाचे आधुनिक विचार असलेल्या महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपातून लोकशाहीची निर्मिती केली.श्रमपूजा हीच शिवपूजा महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केलेली शरणसंस्कृती म्हणजे मध्ययुगीन कालखंडातील श्रमसंजीवनीच होती.
त्यांचा अनुभव मंडप तर समतावादी विचारांची प्रयोगशाळा व श्रमिकांची श्रम शाळा होती. अनुभव मंडप हे बसवण्णा यांच्या विचारांचे संस्कारपीठ होते.बसवेश्र्वरांनी तेथे होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जातिजमातींच्या लोकांमध्ये बंधुभाव आणि विचार-स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली. बारावे शतक हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. धर्म सुधारण्याची व मानवाधिकाराच्या संवर्धनाची व परिवर्तनाची चळवळ याच शतकात देशातील विविध भागात सुरु झाली होती.महाराष्ट्रात चक्रधर स्वामी, उत्तरेत संत कबीर, पंजाबमध्ये गुरुनानक व कर्नाटकमध्ये महात्मा बसवेश्वर अशा विभूतींनी साम्यवादाची चळवळ संपूर्ण देशभर उभी केली.बसवेश्वरांनी हा बंधुभाव धर्मात कायम ठेवला. आपण जे कमवतो त्यात ईश्वरांचा वाटा आहे. म्हणून त्यातील दीन दु:खीच्या जीवन कल्याणासाठी दानधर्म केला पाहिजे.यावर त्यांनी भर दिला होता.अशा या थोर आद्य समाजसुधारक, युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला आणि विचाराला कोटी कोटी प्रणाम….
-श्रीकांत संभाजी मगर
नांदेड.
९६८९११७१६९