पवित्र रमजान म्हणजे आत्मिक शुद्धीकरण चा महिना.. ..! मौलाना कासीम शेख..

 

फुलवळ( धोंडीबा बोरगावे )

इस्लाम ( मुस्लिम ) धर्मीय बांधवांचा पवित्र असणारा रमजान महिना म्हणजे आत्मिक शुद्धीकरण चा महिना असून या महिन्यात जे उपवास केले जातात त्याला रोजा असे म्हटले जाते हे सांगतानाच मोहम्मद पैगंबर यांनी′ याच रमजान महिन्यात अरब देशातील मक्का शहराजवळ असलेल्या गारे हिरा नावाच्या गुंफेत जाऊन सांसारिक व्यवहारचा त्याग करून अल्लाह च्या सानिध्यात राहून भक्तीमध्ये हा पूर्ण महिना घालवला , या रमजान महिन्यात मोहम्मद पैगंबर यांनी केलेली भक्ती फळाला आली. आणि तो भक्तिभाव अविस्मरणीय राहिला व त्याच घटनेची आठवण व स्मरण म्हणून या रमजान महिन्यात महिनाभराचा उपवास रोजा म्हणून केला जातो आणि नामस्मरण म्हणून दररोज पाच वेळा नमाज अदा केली जाते.

 

 

त्याच बरोबर या काळात सांसारिक व्यवहारापासून थोडे दूर राहून , मोह , मत्सर , राग सोडून मन व शरीर शुद्धीकरण करण्यासाठीच त्या अल्लाह चे नामस्मरण केले जाते असे फुलवळ येथील मौलाना कासीम शेख यांनी माहिती दिली.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की , रमजानुल मुबारक हा इस्लामी धर्माचा पवित्र महिना असून या महिन्यात अल्लाहने रोजे (उपवास) ठेवण्याचा हुकूम दिला आहे , अल्लाह ने हा आदेश भक्तांच्या शरीरात अशक्तपणा यावा म्हणून नाही तर उपवासाने मानवी शरीर , मन आणि आत्मिक शुद्धीकरण करण्यासाठी उपवास करावेत असा आदेश दिला आहे. त्याच बरोबर या महिन्यात आपल्याला जमेल त्या वस्तू ची जकात ( दान ) केले पाहिजे म्हणून या महिन्यात दानधर्म ही मोठ्या प्रमाणावर केले जाते.

 

ज्या ज्या वेळी माणसाचे पोट भरलेले असते तेंव्हा त्याच्या शरीराचे सर्व अवयव उपाशी असतात , म्हणजेच मानवी शरीराला भौतिक सुखाची इच्छा शक्ती वाढते . आणि अशा इच्छेपोटी माणूस नको त्या थराला जाऊन आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो आणि त्याच काळात अनजानपणात माणसाच्या हातून चूका आणि अनर्थ घडत असतो .

 

 

परंतु जेंव्हा माणसाचे पोट उपाशी असते तेंव्हा सर्व अवयव समाधानकारक गप्प असतात. त्यांच्यात कसलीच भौतिक सुखाची इच्छाशक्ती नसते.

प्रत्येक भक्तीत याची प्रचिती येतच असते , परंतु उपवास हा देखावा नसून अल्लाह ची अशी भक्ती आहे की जो रोजा पकडतो तो माझा उपवास, माझा उपवास आहे असे सांगत नाही आणि तसे नसावेही कारण उपवास हा इतरांच्या प्रदर्शनासाठी नसून फक्त अल्लाह ला राजी करून घेण्यासाठीच असतात.

 

 

आजची पिढी संगकणकाच्या युगात इंटरनेट , मोबाईल च्या दुनियेत रमजान सारख्या पवित्र महिन्यात ही भरकटत असल्याचे दिसून येते. तेंव्हा या पिढीला सावरण्यासाठी आणि अशा द्विधा मनस्थितीत जीवन जगणाऱ्यासाठी रमजान चे रोजे अतिशय उपयुक्त ठरतात. कारण उपवास असला की मानवी शरीराला अन्य कोणत्याही प्रकारच्या भावना , अनाठायी विचारसरणी मनात घुटमळत नाही. उपवास करणे म्हणजे शारीरिक सुखावर प्रतिबंध घालून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचा उत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

 

 

दिवसभराच्या उपवासामुळे शरीरात जो अशक्तपणा वाढतो आणि शारीरिक स्वास्थ्यावर निस्तेजपणा जाणवतो तो दूर करण्यासाठी उपवास सोडताना आवर्जून पेंडखजुर ( खारीक ) चे सेवन केले जाते. कारण पेंडखजुर ही मानवी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते आणि ती खाल्यामुळे थकवा दूर होऊन अशक्तपणा पण जाणवत नाही हे सांगतानाच ते म्हणाले की माझा भारत देश हा काल ही अखंड होता , आजही आहे आणि उद्याही राहील यात तिळमात्र शंका नाही.

याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रमजान या पवित्र महिन्यात उपवास असतो तो आम्हा मुस्लिम बांधवाना , परंतु आजही माझ्या देशात अशी परंपरा आहे की मुस्लीम बांधवांच्या उपवास सोडण्याच्या वेळेला मुस्लिम बरोबरच हिंदू धर्मातील अनेक बांधव सुद्धा आजही रोजा सोडण्यासाठी वेळेला आम्हा उपवासकर्त्याना पेंडखजुर , फळफळावळ मजिद मध्ये आणून देतात हे काय ऐक्याचेच प्रतीक आहे ना म्हणून तर म्हणतोय माझा भारत देश नेहमीच अबाधित असेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *