फुलवळ सह परिसरात अवकाळी पाऊस व गारांच्या धास्तीने वीट उत्पादक व हळद उत्पादक शेतकऱ्यांना भरली धडकी.. ..आले देवाजीच्या मना , तेथे कोणाचे चालेना

फुलवळ(धोंडीबा बोरगावे )

फुलवळ सह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस , सोसाट्याचा वारा चालू असून ता.२७ एप्रिल रोजी झालेल्या गारपिटीने सध्या हळद पीक काढणीचे दिवस चालू असून हळद उत्पादक शेतकरी हळद पीक काढून ती शिजवून सुकवण्यात व्यस्त आहेत, तर वीट उत्पादक मालक आपल्या मजुरांच्या माध्यमातून जास्तीत जास्त वीट तयार करून त्या सुकविण्यासाठी धडपडत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट होत असल्याने याचा परिणाम आपल्या शेती व उद्योगावर होऊन आपले फार मोठे नुकसान होत असल्याने मनात धडकी भरलेल्या हळद उत्पादक व वीट भट्टी उत्पादकांना याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. पण कोण जाणे आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या मार्च महिन्यात ता.१६ व १७ तारखेला अवकाळी पावसाने दर्शन देऊन गारा मिश्रित पावसाच्या माध्यमातून गहू, हरभरा, करडई, ज्वारी, भाजीपाला, आंबा व वीट उद्योगांचे मोठे नुकसान केले. त्यानंतर आता ता. २५ एप्रिल पासून अचानक चालू झालेल्या या अवकाळी पाऊस , सोसाट्याचा वारा आणि गारांचा मारा यामुळे शेतकऱ्यांसह वीट उत्पादकही आर्थिक दृष्ट्या संकटात सापडून हातबल झाले आहेत. यासाठी भोळाभाबडा शेतकरी निसर्गाकडे हात जोडून प्रार्थना करत आहे.

गत मार्च महिन्यातील १६ ते १७ तारखेचे नैसर्गिक संकट गेले म्हणून कशीबशी सावरा सावर करत शेतात काढणीला आलेले हळद पीक व ज्वारी उरला सुरला गहू काढणीला वेग आला आहे. शेतमजुरांची मनधरणी करून गहू, उन्हाळी ज्वारी व हळद काढून ती शिजवून सुकविण्यासाठी शेतकरी राजा डोळ्यात तेल घालून दिवस रात्र या कामी परिश्रम करत होते त्यातच पुन्हा या एप्रिल महिन्यात गत तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असून सोबतच गारांचा मारा चालू आहे.

‌‌ सध्या होत असलेल्या या अवकाळी पावसाची धास्ती घेत सुकवण्यासाठी पसरून ठेवलेल्या हळद पिक व कच्च्या विटा एकत्र गोळा करून झाकून ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी मजुरांसह मालकांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून येत असून सामान्य माणसाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *