निसर्ग सेवा गट पानभोसी च्या सौजन्याने चालु असलेली रोज एक रोप लागवड चळवळ – दत्तात्रय एमेकर यांना वृक्ष भेट

कंधार ; निसर्ग सेवा गट पानभोसी च्या सौजन्याने
चालु असलेली रोज एक रोप लागवड चळवळ आता हळूहळू लोकसहभाग व प्रचंड प्रतिसाद निसर्ग प्रेमींचा निसर्ग सेवेतुन दिसुन येते आहे,तसेच आज एक वर्ष ,तिन महिने चोविसावा दिवस (479 वा दिवस) अर्थात आज दि24/04/2023रोजी चिखल भोसी येथील केसे-अनेराव परिवाराच्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून कंधारकडे पानभोसी मार्गे परत येतांना निसर्ग सेवा गटाचे संयोजक वृक्षमित्र आपले जीवन वृक्षवल्ली सेवेसाठी खर्चीणारे व्यक्तीमत्व मा.शिवसांबजी घोडके साहेब यांच्या रोज एक रोप लागवड चळवळीच्या निमित्ताने आज श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोसी येथे, निसर्ग सेवा गट पानभोसीच्या वतीने*अतिशय सुंदर औषधी उपयोगी , फळ वर्गीय अतिशय सुंदर निसर्गाच्या सौंदर्यात भर घालनारे “जांभूळ”या सुंदर प्रजातीच्या रोपांची लागवड केली.*
मा. दत्तात्रय एमेकर गुरुजी प्रसिद्ध कवि,लेखक क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार श्री शिवाजी हायस्कुल कंधार जि. नांदेड मा.शिवाजीराव सुर्यवंशी साहेब कृषी सहाय्यक कृषी कार्यालय अहमदपुर जि. लातूर मा.विठ्ठलराव ऊर्फ प्रशांत आवले साहेब एरिया मॅनेजर मारुती सुझुकी लातूर यांच्या उपस्थितीत मा. गंगाप्रसाद शिवलिंगआप्पा स्वामी महाराज*
कु.गायत्री वसंत नाईकवाडे,कु.श्रावणी शिवानंद भोसीकर*
कु.रागीणी माधवराव भोसीकर,कु.श्रद्धा शरदराव घोडके*
कु.शिवराणी शिवसांब घोडके,कु.कल्याणी गंगाप्रसाद स्वामी उपस्थित आदी निसर्ग प्रेमी,पर्यटक, स्नेही ,मान्यवर तसेच
निसर्ग सेवक मा. मोतीराम एकनाथ भोसीकर मा.बळवंत दत्तात्रय भोसीकर सर,मा.मनोहर रंगराव नाईकवाडे गुरुजी*
मा. शंकर बालाजीराव घोडके,मा.मलिकार्जून ईश्वरराव नाईकवाडे*सावकार,मा. शिवराज संभाजीराव गोंड तंटा मुक्ती अध्यक्ष मा. संग्राम संभाजीराव नरंगले गुरुजी*
मा.अशोक आनंदराव पाटील आदी निसर्ग प्रेमी, निसर्ग सेवक पर्यावरण रक्षक यांनी यापूर्वी विविध मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व रोज एक रोप लागवड केलेल्या रोपांना पाणी दिले गेले निसर्ग सेवा गटाच्या वृक्षारोपण कार्यक्रम सहभागी होता आले.निसर्ग सेवा करण्याची संधी स्वीकारणाऱ्या सर्व निसर्ग प्रेमी व निसर्ग सेवकांचे मनस्वी आभाराभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *