जसे आपण लिहीतो
तसे वागतो का ??,,
प्रिय सोनलजी
मी तुमचा वाचक आहे आणि तुमच्या विचारामुळे मी ड्रींक बंद केले. काल तुम्हाला मिर्चमसाला रेस्टॉरंट ला पाहिले .तुमचा मित्रपरिवार होता म्हणुन मी तुमच्याशी बोललो नाही पण मी निरीक्षण करत होतो तर तुम्ही फक्त सॅलड आणि पनीर खाल्ले आणि ९ वाजता तिथुन बाहेरही पडला. त्यावेळी जाणवले ही व्यक्ती जशी लिहीते तशीच ती आहे .सॅल्युट तुम्हाला आणि तुमच्या विचाराना.
सोनलजी खरच सुंदर आहात हो
खरच शिल्प
केदार दिवेकर
हा वरील मेसेज कॉपी पेस्ट केलाय जो माझ्या वाचकाने पाठवलाय.. मी माझ्या लेखनातुन अनेक विचार माझ्या वाचकांना देते.. यात २ गोष्टी आहेत..
एकतर माझे वागणे , बोलणे तसेच असायला हवे जसे माझे लिखाण
दुसरे म्हणजे मी चांगली वागले तरच मी दुसऱ्याला सल्ले द्यावेत..
मी रोज वेगवेगळ्या विषयावर लिहीते त्यातील बऱ्याचदा मला आलेले अनुभव असतात किवा काही चांगलं वाचलेलं असतं..मला आणि माझ्या विचाराना फॉलो करणारी अनेक मंडळी आहेत तेव्हा माझी जबाबदारी अधिक वाढते .. व्यायाम करा म्हणते तेव्हा मी रोज दिडतास व्यायाम करते.. रात्री कधीही उशीरा मी ol नसते तर वाचत असते.. मी लवकर झोपुन लवकर उठते .. कमीतकमीवेळा बाहेरखाणे आणि खाल्लां तरी त्यातलं निवडून चांगलं खाते.. No drink ..no smoke..आणि कोणीही माझ्याशी बोलायला आलं आणि मी कितीही घाईत असले तरीही माझ्या वाचकांना डावलुन मी पुढे जात नाही .. त्यामुळे आपले वागणे बोलणे याचा ताळमेळ असायलाच हवा ..
खुप followers मिळवुन मोठे होण्यापेक्षा आपल्या वाचकांच्या आणि चाहत्याच्या मनात आदराचे स्थान मिळवुन द्यायला मला कायम आवडेल..
Thanku kedarji.and Thanku all
सोनल गोडबोले
लेखिका, अभिनेत्री