नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई संजय भोसीकर यांच्या हस्ते फुलवळ येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ध्वजारोहन

 

कंधार ; प्रतिनिधी

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित फूलवळ तालुका कंधार येथे निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन करून अभिवादन सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई संजय भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे,कृष्णाभाऊ भोसीकर,सरपंच विमलबाई मंगनाळे माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण,बसवेश्वरराव मंगनाळे, सुर्यकांत मंगनाळे,नागनाथ मंगनाळे,बापुराव मंगनाळे,नवनाथ बनसोडे,महेश मंगनाळे,माजी सरपंच बालाजीराव देवकांबळे,जयंती मंडळ व आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *