सततची नापीकी व कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

फुलवळ(धोंडीबा बोरगावे )

सततची नापिकी व बँकेच्या कर्जाला कंटाळून फुलवळ पासून जवळच असलेल्या कंधारेवाडी येथील तरुण शेतकरी शिवाजी रामराव मंगनाळे वय ३५ वर्षे, यांनी दिनांक २८ एप्रिल रोज शुक्रवारी सकाळी ९ वाजताचे सुमारास फुलवळ शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, आई ,वडील, व भाऊ असा परिवार आहे.

आत्महत्याग्रस्त तरुणाचे वडील रामराव मंगनाळे यांना काही महिन्यांपूर्वी अर्धांगवायू झाला असून ते घरातच पडून आहेत. घरची आर्थिक परिस्थिती नाजूकीची आहे. वडिलांचा दवाखान्याचा खर्च, सततची नापिकी व दैनंदिन कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालवण्यासाठी लागणारा खर्च झेपत नव्हता , त्यातच बँकेच वडिलांच्या डोक्यावरचे कर्ज यामुळे सर्वच बाजूने आर्थिक कोंडीत सापडलेला शिवाजी मंगनाळे हा गत दोन महिन्यापासून चिंताग्रस्त झाला होता.

अशाच चिंतेत दिनांक २८ एप्रिल रोज शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेताकडे जाऊन येतो म्हणून गेला आणि स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याची फिर्याद मयताचे चुलते बाळू माणिका मंगनाळे वय ७५ वर्षे ,धंदा शेती, राहणार कंधारेवाडी यांनी दिली. यांचे फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामा पडवळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण मुखेडकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *