Nudity
आणि बाईपण भारी ( Heavy ) देवा..
काल सचिनने बाईपण भारी देवा सिनेमाची तिकीटस काढली होती म्हणुन मी सिनेमाला गेले.. उत्तम डीरेकशन , उत्तम स्टारकास्ट पण माझ्यासाठी यात नवीन काहीच नव्हते.. कारण मी हे रोज जगते ,अनुभवते.. पण हा सिनेमा माझ्यासाठी बनवलाच नव्हता तर तो सर्वसामान्य स्त्री साठी बनवला गेलाय .. सिनेमा पहायला आलेल्या बऱ्याचशा सखी या हेव्ही वाटल्या ( चेष्टा नाही आणि माफी मागुन सत्य लिहीतेय ) .पण पाहुन वाईट वाटलं.. त्यात एक सीन होता ज्यात सुचित्रामॅड्म सॅंडवीच खात काहीतरी बोलत आहेत .. तो सीन पहात असताना माझ्या शेजारची सखी म्हणाली , अगं आता भुक लागली आपण आज सॅंडवीच खाऊयात..म्हणजेच काय तर त्या सिनेमात सांगितलय काय आणि आपण घेतोय काय ..
त्या सिनेमाची स्टोरी वेगळी अजिबात नाही पण त्यातुन घेतलं तर खुप काही घेण्यासारखं आहे पण स्त्रीची ते घेण्याची खरच मानसिकता आहे का ??.. स्त्रीच स्त्रीचा द्वेष करते.. स्त्रीच गॉसीपींग करते.. तीच लैगिकतेवर बोलत नाही किवा जाणुन घेत नाही .. त्यात मेनोपॉजवर बोललं गेलय , किती जणी यावर विचार करतील ?? .. किती जणी यावर चर्चा करतील.. आपण आपली विचारसरणी बदलली नाही तर निर्मात्याला त्याचे पैसे मिळाले आणि आपण आपला मौल्यवान वेळ आणि पैसा वाया घालवला असच म्हणावं लागेल.. सिनेमानंतर होटेलींग आलं आणि व्यायाम अजिबात नाही.. बाईपण हेव्ही नको तर लय भारी व्हायला हवं असेल तर प्रत्येक स्त्रीने बदलायला हवं कारण तोच कुटुंबाचा पाया आहे.. पुन्हा नव्याने विचार करा .. घरी स्वयंपाक करायचा आळस करु नका कारण आपली मुलगी आणि सुन आपलं अनुकरण करणार आहेत…
याच अनुषंगाने नग्नता हा विषय घेतेय कारण जेव्हा संपूर्ण कपडे काढुन आपण आपल्या शरीराकडे पहातो तेव्हा आपली आपल्याला लाज वाटली तरच आपण व्यायाम आहाराकडे वळु शकतो.. इतके सुंदर अवयव निसर्गाने आपल्याला बहाल केले आहेत त्याचा निव्वळ हा अपमान आहे.. सतत पार्ट्या ,ड्रींक , स्मोक आम्ही कशातच मागे नाही पण मग सुंदर मन आणि शरीर सांभाळायला आपण मागे का ??.. हा प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा ना… ठरावीक उंची ला ठरावीक वजन किवा 36.. 24 .. 36 ही परीमाणं उगाच दिली आहेत का ??.. शरीरात कीती फॅट्स हवेत कीती शुगर हवी या सगळ्याला काहीतरी अर्थ आहे ना.. हा विचार बदलला तर महिला दिन साजरा करायची वेळच येणार नाही.. त्या दिवसाची आपल्याला काहीही गरज नाही.. पुरुषांकडुन एकच दिवस उदोउदो करुन घ्यायची काय गरज ??..
कटु आहे पण सत्य आहे.. मीही काल सिनेमानंतर सचिनला घेउन डिनरला बाहेर जाऊ शकले असते पण मी जातानाच घरी खायला करुन गेले होते.. प्रत्येकजण हे करु शकते.. पुढे जाणारीला मागे खेचण्यापेक्षा आपल्याला पुढे कसं जाता येइल हे पहाणं गरजेचं आहे..माझ्या वाचक सखीनी यातुन चांगलं घ्यावं हाच उद्देश या पोस्टचा आहे..
सोच बदलो.. देश बदलेगा
सोनल गोडबोले..