ह भ प संजय महाराज नागपूरने यांचे वाढदिवसा निमित्य अभिष्टचिंतन

अहमदपूर ( प्रतिनिधी )छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य ह भ प संजय महाराज नागपूरने यांचे वाढदिवस आज दिनांक 23 जुलै 2023 रोजी छत्रपती शाहू राजे योगा मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत साजरे करण्यात आले त्यानिमित्त छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य माधवराव तिगोटे सर यांनी
भोजन आणि चहा पाण्याची व्यवस्था केली याप्रसंगी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप आणि त्यानिमित्त जमलेल्या इतर मान्यवरांनी संजय महाराज नागपूरने यांचे शाल श्रीफळ पुष्पराज देऊन अभिष्टचिंतन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भोजनदान योगदानाबद्दल माधवराव तिगोटे यांचेही सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अविनाश मंदाडे आणि ज्ञानोबा भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश वाघमारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *