लीना आणि दीवीज यांच्या लग्नाला २५ वर्षे होणार होती..एका
आठवड्यावर त्यांची ॲनीव्हरसरी होती.. तिला माहीत होतं दीवीज काहीतरी सरप्राइज प्लॅन करणार.. ते सरप्राइज असलं तरीही तिला उत्सुकता होती.. तिने तिच्या मुलीकडून जाणुन घ्यायचा प्रयत्न केला पण तिलाही काही माहीत नव्हतं..
दरवर्षी तो तिला सरप्राइज देतो पण त्यावेळी त्याच्या फोनवरील बोलण्यातुन हिला काहीना काही हिंट मिळायची पण यावेळी तसं काहीच जाणवत नव्हतं.. दिवीज विसरला की काय ?? अशीही तिला शंका आली .. पण त्या दोघांचं एकमेकांवर खूपच प्रेम होतं त्यामुळे तिने मनातच विचार केला ,दरवर्षी त्यानेच का प्लॅन करावेत ??.. त्यानेच का सरप्राइज द्यावी ??.. यावर्षी मीच काहीतरी करते. पण नक्की काय ??..तिच्या मनात विचार आला की ॲनीव्हरसरी सोहळा साजरा व्हायला हवा..
त्याला काय आवडतं याची मनातच लिस्ट तयार झाली…सगळ्यात टॉप लिस्ट ला असणारी त्याची आवड म्हणजे सेक्स, फोरप्ले , रोमान्स,, गेली २५ वर्षे हेच तर करतोय असही तिच्या मनात येवुन गेलं पण तरीही याचा सोहळा कधीच झाला नाही असं तिला वाटलं..नवरा बायको मधे सुद्धा सोहळा होवु शकतो ?? .. नक्कीच होवु शकतो.. त्यासाठी हवा नवा विचार.. नव्याने त्या नात्याकडे पहाण्याची तयारी.. २५ वर्षात राहुन गेलेल्या गोष्टी करण्याची हीच तर सेकंड इनींग असते…फाइव्हस्टार मधे रुम बुक करुन ती सजवायला सांगंते. दीवीजला म्हणते यावेळी माझ्याकडून तुला सरप्राइज आहे त्यामुळे तु काहीही प्लॅन करु नकोस.. त्याला वाटलं ,,ही मित्रमैत्रीणीना बोलवुन डिनर प्लॅन करेल पण जेव्हा तो होटेल च्या रुममधे जातो आणि पुढचे दोन दिवस ते दोघेही रुमच्या बाहेर पडत नाहीत. ऱाहुन गेलेल्या अनेक फॅंटसीजचा उत्तम सोहळा ती त्याच्यासाठी करते.. आयुष्यात कधीही विचार न केलेल्या गोष्टी लिना त्याला देते त्यामुळे त्याच्या डायमंड नेकलेस सरप्राइजची त्याला लाज वाटायला लागते.. त्याने आणलेला नेकलेस तो तिच्या गळ्यात घालतो आणि म्हणतो माझ्या मित्रांच्या विवाहबाह्य संबंधाच्या अनेक कथा ऐकल्या आणि एक क्षण मलाही मोह झाला होता पण मी तो वेळीच आवरला म्हणुन हा उत्तम सोहळा आज अनुभवायला मिळाला..बायको, आभार नाही मानणार गं पण सगळ्याना असं भरभरुन घरी मिळालं तर किती नाती सुखद होतील ना ??.. वय कुठलही असो आणि नात्याला कितीही वर्षे झाली असुदेत त्यात नावीन्य शोधुन आनंद घेता येवु शकतो..
सोनल गोडबोले.. लेखिका.. अभिनेत्री