तळ्याचीवाडी येथिल शिष्टमंडळाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची घेतली भेट

कंधार ; प्रतिनिधी

तळ्याची वाडी तालुका कंधार या गावचे विकासाभिमुख भुमीपुत्र भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड व माजी सरपंच  बाळासाहेब गर्जे  आणि भाजपा सरचिटणीस माजी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी किशनराव डफडे , यांच्या नेतृत्वाखाली तळ्याची वाडी या गावचे नुतन सरपंच आणि उपसरपंच व सदस्य शिष्टमंडळ यांनी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन  गावातील विकास कामासंदर्भात चर्चा केली .

यावेळी खासदार, लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी  गावाच्या विकासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचा शब्द दिला, यावेळी तळ्याचीवाडी चे नवनिर्वाचित सरपंच प्रतिनिधी  प्रभाकर केंद्रे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या,यावेळी भाजपा प्रदेश सदस्या मा.सौ प्रणिताताई देवरे चिखलीकर,अशोकराव मुसळे, माजी सरपंच,विश्वनाथ गर्जे,सदस्य राजीव केंद्रे,प्रदीप मंगनाळे,बाबुराव तांबोळे, शिवाजी तांबोळे,उपसरपंच खुशाल तांबोळे,प्रकाश पवार विनोद राठोड, बालाजी जाधव ,संग्राम गर्जे गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .

गावाच्या विकासा साठी एकत्र येऊन गाव हित जपण्याचा निर्णय गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतल्याचा आनंद आहे….
आजचा क्षण हा तळ्याची वाडी साठी महत्वाचा क्षण आहे कारण गावविकासाठी या पुढे गतिरोधक लागनार  नाही असे भगवान राठोड व बाळासाहेब गर्जे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *