मुखेड: प्रतिनिधी
सर्पदंशाबद्दल देवदूत असलेले मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे यांनी दिनांक 3 जुलै रोजी एकाच दिवशी सर्पदंश झालेले पाच रुग्ण पुंडे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. पांडुर्णी येथील निळकंठ विठ्ठलराव श्रीरामे यांना सर्पदंश झाल्याचे समजतात प्रभाकर कागदेवाड यांनी पुंडे हॉस्पिटल गाठले. त्यावेळी अति गंभीर पाच रुग्णावर डॉ.पुंडे साहेब उपचार करत होते अत्यंत मरणावस्थेत असलेल्या रुग्णांना त्यांनी जीवनदान दिले. शिकारा येथील अनिता बालाजी जाधव ही चाळीस वर्षाची महिला अत्यंत गंभीर अवस्थेत होती हे सर्व चित्र प्रभाकर कागदेवाड यांनी पाहिले व सर्वच रुग्ण बरे झाल्याने त्यांनी मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे साहेब यांचा सत्कार केला यावेळी डॉ. उमेश पाटील, डॉ. परमेश्वर वाघमोडे, दादाराव आगलावे, शंकर चव्हाण, व्यंकट शिंदे उपस्थित होते. यावेळी सहकार्य केलेल्या शंकर चव्हाण व व्यंकट शिंदे यांचाही सत्कार प्रभाकर कागदेवाड यांनी केला. यावेळी पुंडे हॉस्पिटल मधील कर्मचारी बालाजी डोणगावे, श्रीनाथ येवतीकर, दिनेश देव्हारे, राम यांची उपस्थिती होती.
चौकट:
या आठवड्यात सर्पदंशाचे अनेक रुग्ण -डॉ. दिलीपराव पुंडे
मागील आठवडा हा सर्पदंशाचे अति गंभीर रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून त्यांच्यावर खूपच सावधगिरीने उपचार करावा लागला. सर्पदं जनजागरणाचे अनेक कार्यक्रम घेऊनही सर्पदंशास शेतकरी शेतमजूर वर्ग त्यास बळी पडत आहेत. शेतीमध्ये किंवा घरी काम करत असताना सम्राट सर्पदनश होणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.