श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  बारुळ येथे डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांची जयंती 

बारूळ ; 
मन्याड नदीवर मराठवाड्यातील मातीचे सर्वात मोठे लोअर मानार धरण बांधले.या प्रकल्पाच्या उत्तरेला असलेल्या भगवान शंकराच्या पावनभूमी बारुळ नगरीत नावलौकिक मिळविल्या क्रांतिसूर्य मन्याड खोर्‍यातील ढाण्या वाघ,विधानसभा अन् भारतीय संसदेतील कंधारी मुलुख मैदानी तोफ, संस्थापक व संचालक श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेतील शाखा श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारुळ या शाळेत ओळख मुक्ताईसुत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त सदर सप्ताहाचा आज तिसऱ्या दिवसाचे पुष्प गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांनी गुंफले.या कार्यक्रमात अध्यक्ष मुख्याध्यापक अनिल वट्टमवार सर, होते.
डाॅ.भाई मुक्ताईसुत यांचे राजकारण,सत्याग्रह व पुरोगामीत्व आणि जीवावर बेतलेल्या कांही संकटावर लाइव वृत्तांत आपल्या वाणीतून मांडला.मरुमाईचा गाड्यांचे मनकर्णिकेत विसर्जन करणारे महाराष्ट्रातील एकमेव घटनांबद्दल सांगीतले.१९६४ साली रूक्म्या डाकू (रुक्माजी घोबाळे) यांनी केरवाडी येथे डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांचेवर सुपारी घेवून नेम धरलेला असतांना त्यानंतर त्यांच्या डाकूच्या मनावर झालेले मानवतेचे दर्शन यामुळेच आयुष्यातील शंभरीपार व्यक्तीमत्व जगले.२५ जुन १९७२ या वर्षी बहाद्दरपुऱ्यात नंदीच्या ढेल्यात सहकार्यांशी चर्चा करतांना अती विखारी मण्यार जातीच्या सापाने बोटाला दंश केला.त्यावेळी कांहीतरी चावले आहे असे वाटता त्या ओट्याचा दगड काढताच मण्यार साप दिसताच डाॅ.भाई साहेब यांनी न घाबरता त्या सापाचे तोंड ठेचून मारले अन् दवाखान्यात घेवून गेले.तेंव्हा लोहा येथील सरकारी दवाखान्यात नेले तेथे कार्यरत डाॅक्टर माधवराव रणदिवे साहेब होते.त्यांनी त्या सापाचे विष उतरविले.डाॅ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांना जीवदान मिळाले.त्यानंतर डाॅ रणदिवे साहेब यांना सरकारी नोकरी सोडून कंधाराला येण्याचे आव्हान स्वीकारून कंधारला आले.आज त्या घटनेचा सुवर्ण महोत्सव आहे.शेंबूडपूशी सत्याग्रह, रक्तबंभाळ गर्दभराजाचा सत्याग्रह, गुदगुल्या सत्याग्रह, खईस कुत्री सत्याग्रह, पिंडदान सत्याग्रह, नानाविध सत्याग्रह चा जिवंत इतिहास विद्यार्थ्यापुढे मांडला,आणीबाणीविरुद्ध घोषणा दिल्याच्या कारणावर अटक दोन मुके चिंचोली येथील पंढरीनाथ कौंसल्ये आणि बहाद्दरपुरा येथील पंढरीनाथ वंजे यांना न्यायालयात उभे केल्यानंतर झालेली पोलिस अधिकार्यांची फजिती.पहिल्या १९५७ विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकी पासून ते १९७२ पर्यंत १९७७ खासदार म्हणून निवड त्यांनंतर पून्हा १९८० व १९८५ या निवडणुकीत कंधार विधानसभेत सहा टर्म व एक टर्म नांदेड लोकसभा प्रतिनिधित्व केले होते.या कार्यक्रमात गुराखीपिठावर दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांना ढोबळी मिरची,भेंडी,मिरचीचे गुराखी हार भाईंच्या प्रतिमेस घालून त्यांना भावणारे अभिवादन करतांना लेखणी बहाद्दर सिध्दहस्त पत्रकार, लेखक,संपादक असल्यामुळेच डाॅ.भाई साहेबांना पेन आर्पण करुन सर्व विद्यार्थ्यांना लेखनी बहाद्दर व्यक्तीमत्वा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.आभार प्रदर्शन प्रा.कुंभारगावे यांनी मानले,उत्कृष्ट सुत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवसांब सोनटक्के सर यांनी केले.

या कार्यक्रमा प्रसंगी श्री शिवाजी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संघपाल वाघमारे,पर्यवेक्षक कुंडगीर सर,प्रा.अरूण कौसल्ये सर,प्रा.चौथरे सर,प्रा.बी.डी.राठोड सर,प्रा.जोंधळे सर,पत्रकार कोल्हे सर,
भिष्माचार्य मेहेत्रे सर,कलाध्यापक पांडूरंग मेहकरकर,मधुकर शिंदे,माधव पा गायकवाड सर,व्यंकट पाटील लुंगारे सर,राजकुमार ठाकुर, किशन इरलवाड, क्रिडा प्रमुख गुद्दे सर, ओएस भगवान पाटील.धोंडगे लिपिक इंदुरकर, मोरे सर,पेन्सिल स्केच कलावंत प्रदीप सूर्यवंशी सर अन् बंडेवार सर यांनी सर्व कार्यक्रमातील छायाचित्र टिपली आहेत.
रत्नदीप गोरे, जगदीश गोरे, सुदर्शन मोरे,,श्रीभती शोभा मावशी,हळदेकर,शिंदे मामा, आदींसह पाचवी ते बारावी पर्यतचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *