…… माझ्या वाचकाने हा विषय सुचवला आहे.. त्याने लिहीलय कोणी घरात नसताना मी लेडीज कपडे घालतो आणि मी त्यात रमतो.. मला ते आवडतं…
नक्की यामागे काय कारणं असतील ??
माझ्या वाचनात आलेलं मी शेअर करतेय..
स्त्री वेषात राहिल्यावर त्यांना वाटतं की ते स्त्रीची बाजु जास्त चांगल्या पध्दतीने समजुन घेउ शकतात..
कदाचित स्त्रीची पॅंटी किवा ब्रा च्या फीलमुळे त्यांना बरं वाटत असावं.. त्या कपड्यात स्त्रीला काय वाटत असेल याचा अंदाज ते घेत असावेत… काहीजण याला विकृती समजत असतील पण माझ्या मते ताण दुर करायला किवा enxity दुर करायला ते cross dressing चा आधार घेत असावेत..
मेडीकली माहीत नाही पण त्यांना काही क्षणासाठी स्त्री व्हावं वाटत असेल .. म्हणजेच ते तृतीयपंथी नाहीत.. ते अजुन वेगळे असतात.. ते होमो ही नसतात पण कधीतरी गे सुद्धा असु शकतात..
मला वाटतं हे सगळे मनाचे खेळ असावेत.. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असल्याने आणि व्यक्ती स्वातंत्र्य असल्याने त्यांना वाटतं तसं ते वागतात.. काही जणांचा आवाज किवा बोलणं बऱ्याचदा स्त्री सारखं असतं. लहान मुलं तर बऱ्याचदा cross dressing करतात.. Annual Day साठी करणं हे नॉर्मल आहे.. पण मोठी माणसं जेव्हा असं करतात तेव्हा मात्र त्याची कारणं वेगळी असतात.. ज्याला ज्यात आनंद मिळतो आवडेल ते करावं फक्त काहीही करताना आपल्यामुळे कोणाला त्रास होत नाही ना याची काळजी घ्यावी..
एक माझ्या मित्राने त्याच्या मित्रासोबत घडलेला किस्सा सांगितला तो शेअर करते.. त्याचा मित्र त्याच्या घरी राहायला आला होता त्या दिवशी माझ्या मित्राची बायको घरात नव्हती .. त्याने माझ्या मित्राकडे त्याच्या बायकोचा गाऊन घालायला मागितला आणि रात्रभर तो त्या गाऊन मधे होता.. जेव्हा माझ्या मित्राने विचारलं तेव्हा त्याला ते आवडतं आणि घरी तो रोज गाऊन घालुन झोपतो असं त्याने सांगितलं.. वाचायला विचित्र वाटेल पण हे सत्य आहे..
तूम्हीही नक्कीच व्यक्त होवु शकता… कुठल्याही गोष्टीकडे वाईट नजरेने न पहाता सगळ्या बाजूचा विचार केला तर कुठल्याही गोष्टीची किळस किवा घृणा वाटत नाही.. नवनवीन गोष्टीवर चर्चा व्हायलाच हवी..यासाठी हवं चौफेर वाचन आणि चारही बाजूने विचार करण्याची मानसिकता..
या जगात कोणीही आणि काहीही वाईट नाही..
सोनल गोडबोले..