वयानुसार शरीरात होणारे बदल

वयानुसार शरीरात होणारे बदल
स्विकारायलाच हवेत..
काल मला माझी वाचक सखी भेटली होती .. वय वर्षे ५४ .. लहानपणापासूनच तिला व्यायामाची आणि चांगलं रहाण्याची आवड होती.. वयाची ५० शी ओलंडल्यावर तिच्या शरीरात बदल दिसु लागले.. मेनोपॉजमुळे हार्मोनल चेंजेस झाले.. व्यायामात उत्साह वाटत नव्हता त्यामुळे पोट कंबर वाढु लागली.. तिला वाटु लागलं आता आपल्याकडे कोणी पहाणार नाही त्यामुळे ती डीप्रेशन मधे गेली..
चार महिन्यापूर्वी मी तिला भेटुन तिच्याशी बोलले होते त्यानंतर ३ वेळा तिच्याशी फोन वर बोलले होते आणि काल जेव्हा मी तिला भेटले तेव्हा ती एकदम नॉर्मल होती.. ५ किलो वजन कमी केलं होतं.. पोट कंबर बरीच कमी झालेली होती..
आणि विशेष म्हणजे बियॉन्ड सेक्स वाचल्यावर तिच्या मित्राकडे पहाण्याचा तिचा दृष्टीकोन बदलला होता आणि तोच मित्र काल तिच्यासोबत मला भेटायला आला होता.. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना मला भेटता नाही आलं म्हणून काल त्यांनी मीट ठेवली होती.. खास माझी कृतज्ञता व्यक्त करायला ..
मेनोपॉजल चेंजेसमुळे योनीला आलेला कोरडेपणा किवा लैंगिकतेमधे आलेला निरुत्साहीपणा या सगळ्याचं खापर ती स्वतःवर आणि वयावर फोडत होती.. वयानुसार शरीरात आणि मनावर होणारे बदल हे स्विकारले नाहीत तर आपण मानसिकरुग्ण होवु शकतो आणि मग त्यातुन परत बाहेर यायला खुप कठीण जातं.. निसर्गाच्या पुढे आपलं काहीही चालत नाही .. त्यामुळे स्वतःला बिझी ठेवा .. चांगलं वाचा.. उत्तम वाचलेलं आचरणात आणा .. छंद जोपासा.. व्यायाम करा.. घरचं ताजं अन्न घ्या.. जेव्हा मी ४ महिन्यापूर्वी त्या सखीला भेटले तेव्हा ती पुर्णता कोलमडली होती.. कदाचित अशा तुमच्या परिस्थितीचा लोक गैरफायदा घेउ शकतात..
त्यामुळे योग्य व्यक्तीसोबत व्यक्त व्हा.. उरोजाना येणारी शिथीलता हेही एक कारण वयाशी निगडीत आहे पण तरुण वयात जर उरोज लुज झाले असतील तर त्याचा अर्थ तुमचे स्वतःकडे लक्ष नाही
चांगले हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्स आहारात घ्या आणि तेलाने वरच्या साईड ने मसाज करा.. वजनावर कंट्रोल ठेवायच म्हणजे तोंडावर ताबा हवा त्यामुळे काय , कधी , किती खायचं हेही समजुन घ्या.. निसर्गात जा , मस्त भटकुन या .. आणि जे आहे ते स्विकारणं यातच शहाणपणा आहे हे मान्य करा..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *