भाग दुसरा लगेचच लिहावा लागेल असं वाटलं नव्हतं.. पण उच्च शिक्षीत स्त्री सुध्दा जेव्हा असं वागते तेव्हा मात्र तिच्या डीग्रीची , विचारांची आणि वैयक्तीक तिची किव येते.. wp वर जवळपास ३४० ग्रूप्सना मला ॲड केलेलं आहे.. माझा वैयक्तिक कुठलाही गृप नाही.. त्यातील बरेचसे गृप हे साहित्यिक लोकांचे आहेत.. ज्यावर लेखक , कवी रोज खुप छान छान लिहीत असतात.. काही मंडळी खरच खुप सुंदर लिहीतात.. मी वाचते त्यातुन चांगलं घेते आणि त्यावर व्यक्त न होता माझ्या कामात रहाते.. त्याबद्दल त्यांची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते..
काल संध्याकाळी एका डॉक्टर महिलेचा मला फोन आला.. मी अमुक अमुक या गृपवर आहे.. तुम्ही काल लिहीलेल्या आर्टीकलवर एका मुलाने कमेंट केल्या त्या वाचल्या का ?? .. त्यावर मी म्हटलं , मी वाचल्या नाहीत पण काय आहे ते सांगितलं तर बरं होइल .. त्यावर त्या म्हणाल्या , तो विचारत होता , उरोज म्हणजे काय ?? .. मी म्हटलं ,मॅम यात त्याने चुकीचं काय विचारलय ?? .. कदाचित त्याला या शब्दाचा अर्थ त्याला माहीत नसेल.. तुम्ही कोणीही गृपवर याचं उत्तर देउ शकला असता.. त्यानंतर त्या म्हणाल्या , तो वैयक्तिक काही स्त्रीयाना मेसेजेस करतो.. काही दिवसापूर्वी तुम्हीच त्याला झापलं होतं ना ?? मी म्हटलं , मला कोणी शिव्या दिल्या तरीही मी व्यक्त होत नाही.. ते दुसरं कोणीतरी असेल.. मग तुमच्याकडे ब्लॉक हा ऑप्शन आहे की असं मी म्हटल्यावर डॉक्टर महिलेचा इगो दुखावला गेला आणि मॅडम लगेच बोलल्या , मी काय करायला हवं हे मी ठरवेन आणि त्यांनी फोन ठेवुन दिला.. मला कमाल वाट्ली..
एकतर फोन त्यांनी केला होता.. दुसरी गोष्ट म्हणजे तो मुलगा माझा नातेवाईक नाही.. मी त्याला ओळखतही नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाच्या लिखाणावर कोणी आणि काय व्यक्त व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. त्याचा लेखिका या नात्याने माझा काहीही संबंध नाही.. मी माझं काम करते..
काही रोजच्या गोष्टीवर मी यासाठीच लिहीते कारण यातूनच आपण शिकायचं असतं.. उच्चशिक्षीत लोकांकडुन ही अपेक्षा नक्कीच नाही.. आपण सोशल मिडीयावर असताना कसं बोलावं हेही आपल्याला कळत नसेल तर लेखक म्हणून वाचकानी तुमच्याकडुन काय घ्यावं .. साहित्यिक हा लेखणीनेच नाही तर विचाराने मोठा असावा कारण इतर मंडळी त्याचं अनुकरण करत असतात.. एका वाचकाला एका साध्या प्रश्नाचं उत्तर आपण देउ शकत नसु तर मग अशा गृपवर रहाण्याचा आपला उपयोग काय ??.. आपण प्रत्येकाने माणूस म्हणुन मोठं व्हायचय .. प्रोफेशन हे व्यक्ती च्या वागण्यानंतर येतं..
सोच बदलो..देश बदलेगा..
सोनल गोडबोले