कंधार/मो सिकंदर
महावितरण उपविभाग मधील कंधार शहर शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असलेले अबूतालेब गुलाम पठाण यांना दि १ में कामगार दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित नांदेड परिमंडळ नांदेड या वरिष्ठ विभागाच्या वतीने गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी अधिक्षक नांदेड एस.बी.जाधव ,पि.ई.अंबेकर, बागुल एन. महेंद्र ,एस आर पाटील,एस एन कालेवाड यांच्या सह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थितीत होती.
कामगार दिनाचे औचित्य साधून आपापल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे या उद्देशाने आज नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित नांदेड परिमंडळ नांदेड जिल्ह्यासह तालुकास्तरावर विविध विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
पठाण अबुतालेब हे महावितरण कंधार शहर शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असून ग्राहक सेवेसाठी सदैव तत्पर राहून आपल्या कार्याची छाप कंधारवासीयांवर पाडली आहे.त्यांनी ऊन, वारा व पाऊस या गोष्टीची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता “माझी कंपनी “ही संकल्पना मनी रुजवून ग्राहकांना योग्य प्रकारे सेवा दिली व देत आहेत त्या बद्दल त्यांना मूख्य अभियंता, नांदेड यांनी आज दिनांक १ मे २०२३ रोजी जागतीक कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरण कंपनी मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याने पठाण अबुतालेब गुलाम यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
कोणत्याही माणसाचे महत्व हे “पद” मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही, तर तो त्या “पदाला” किती न्याय देतो, तो किती कार्यक्षम, कर्तृत्व, नेतृत्व दाखवतो यावरच त्याचे खरे व्यक्तिमत्व समाजाला समजते.पठाण अबुतालेब यांनी केलेले काम खरोखरच वाखन्यासारखच आहे.त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन कंधार वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.के.राऊत