अल्पशा कालावधीतच तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत.
अनेक सैनिक सेवानिवृत्त होऊन माजी सैनिक होऊन आपल्या मायदेशी परतत असतात. या नंतर मात्र माजी सैनिक हे आपलं कुटुंब आपलं घर ही भूमिका घेऊन आपल्या कुटुंबाकडे जास्तीचे लक्ष देवुन त्यांच्यासोबत वेळ घालण्याचे काम माजी सैनिक करत असतात. बालाजी चुक्कलवाड हा अपवाद व्यक्ती आहे. ज्यांनी सेवा निवृत्तीच्या नंतर कुटुंबाला वेळ देण्या ऐवजी कंधार तालुका भ्रष्टाचार मुक्त करण्याचा यल्गार पुकारला. सैन्यात काम करत असताना देशासाठी शहीद होत आले नाही परंतु तालुक्यातील समाजासाठी काहीतरी वेगळे करावे या उद्देशातून त्यांनी सामाजिक कार्य चालू केले. अंगात आक्रमकपणा, व इमानदारीच्या बळावर ते कंधार तालुक्यातच नव्हे तर नांदेड जिल्ह्यात अल्पशा काळात नावलौकिक झाले. पक्ष कोणताही असो प्रत्येक पक्षातील नेत्यांना त्यांनी आपल्या आक्रमकतेच्या बळावर नाकेनऊ आणुन सोडले. कंधार तालुक्यातील गलिच्छ राजकारण दूर करण्यासाठी त्यांनी एल्गार पुकारला. त्यांनी आपले वडील रामप्रसाद चुक्कलवाड यांच्याविरोधातच बंड पुकारून गावचा विकास झाला पाहिजे, गावातील जातीयता नष्ट झाली पाहिजे या उद्देशाने ग्रामपंचायत बिनविरोध काढून एक नवीन आदर्श जनतेसमोर ठेवला. त्यांच्या कामाची पद्धत पाहून तालुक्यातील अनेक तरुण त्यांच्यावर आकर्षित झाले असून सध्या बालाजी चुक्कलवाड हे तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत.
कंधार तालुक्यातील पाताळगंगा या छोट्याशा गावात 2 मे 1983 रोजी बालाजी रामप्रसाद चुक्कलवाड यांचा जन्म झाला. श्री संत नामदेव महाराज बोरी या शाळेत त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले तर बारावीचे शिक्षण हे महात्मा फुले विद्यालय शेकापुर येथे झाले.घरात वडिलांचा राजकीय वारसा आस्था नाही त्यांनी राजकारणात फारसे लक्ष घातले नाही. देशाची सेवा करावी याच उद्देशाने त्यांनी एका ग्रामीण भागातून कोणतेच क्लासेस न करता जिद्द, मेहनती आणि चिकाटीच्या बळावर 24 जानेवारी 2003 ते भारतीय सैन्यामध्ये दाखल झाले अनेक पदावर प्रमाणिक पणे कर्तव्य बजावले. तब्बल सतरा वर्षे सेवा केल्यानंतर 31 जानेवारी 2020 रोजी ते सेवानिवृत्त होऊन आपल्या गावी परतले. देशासाठी शहीद होत आले नाही ही त्यांच्या मनात खंत राहून गेली असल्याने समाजकार्यात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. “सतरा वर्षे देशासाठी लढलो आता जनतेसाठी लढणार” ही भूमिका घेऊन त्यांनी अनेक आक्रमकपणे आंदोलने त्यांनी हाताळली.
सोनखेड येथील संभाजी कदम हे जवान शहीद झाले होते या जवानाचे नाव लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात यावे या मागणीसाठी बालाजी चुक्कलवाड यांनी एक आंदोलन उभे केले. या आंदोलनाला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. बघता बघता हे आंदोलन एका मोठ्या राजकीय पुढार्यांच्या विरोधात गेले असल्याने बालाजी चुक्कलवाड हे अल्पशा काळातच नांदेड जिल्ह्यात नावलौकिक झाले. याच आंदोलन सर्व संदर्भात दोन वेळेस आत्मदहन करण्याचा आहे त्यांनी प्रयत्न केला. आज या उपजिल्हा रुग्णालयाला शहीद संभाजी कदम यांचे नाव मिळाले नसले तरी या संदर्भात सर्व प्रयत्न मंत्रालयाच्या स्तरावर पोहोचण्याचे काम बालाजी चुक्कलवाड यांनी केली आहे.
कोरोच्या काळातही माजी सैनिक चुकलवाडी यांनी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मोठे काम केले आहे. या काळात जनता रस्त्यावर येऊ नये यासाठी ते सातत्याने दक्षता घेत होते. या कामातूनच त्यांची कंधार तालुक्यात चांगली पकड निर्माण झाली. हळूहळू ते समाजसेवेत उतरत गेले त्यांनी जनतेच्या हितासाठी अनेक आंदोलने हाती घेतली. कंधार तालुका भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे यासाठी त्यांनी सतत दोन वर्षे यशस्वी लढा दिला, प्रत्येक शासकीय कार्यालयात त्यांची दहशत झाली. त्यांच्या या कामामुळे अनेक सर्वसामान्य लोकांचे कामे होऊ लागली. जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर जनतेची आदालत काही महिने यशस्वीपणे चालवली.
चुक्कलवाड यांचे मुळगाव पाताळगंगा या गावात वंजारी आणि गोलेवार या दोन समाजामध्ये मोठा वाद गेल्या अनेक वर्षापासून निर्माण झाला होता. हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन राजकीय जोडी बाजूला ठेवून या दोन्ही समाजातील वाद मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अनेक वर्षे आपल्या वडीलाच्या हातात असलेल्या ग्रामपंचायत मध्ये बंड पुकारले. यानंतर या गावात जातिवाद होणार नसून ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोधच होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. दोन्ही समाजाला एकत्र करून वंजारी समाजाचा सरपंच ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आणून गावातील दोन समाजातील वाद कायमचा मिठवण्यात यशस्वी झाले. गावातील आवाज मिटल्याने सर्व नागरिक आनंदाने राहू लागले ही ग्रामपंचायत भविष्यातही सुरळीत चालावी यासाठी गावातील नागरिकांनीच बालाजी चुक्कलवाड यांना उपसरपंच होण्याचा आग्रह केला या जनतेच्या आग्रा कातील त्यांनी मनात नसतानाही उपसरपंच पद स्वीकारले.
अल्पशा काळातच आपल्या गावचा जो रखडलेला विकास आहे तो झपाटाने व्हावा यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करून गावच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे त्यांनी केली. प्रत्येक घरात पाणीपुरवठा, रस्त्यावर दिवाबती, रस्त्यावरील स्वच्छता. यासारखी कामे करून लोकांच्या मनात स्थान प्राप्त केले. गावातील तरुण व्यसनाने भरकटल्या जाऊ नये यासाठी त्यांनी गावात सर्व लोकांची बैठक बोलून गाव व्यसनमुक्त करण्याचा निर्णय घेतला. गावचा विकास झाला पाहिजे यासाठी बालाजी चुक्कलवाड व त्यांची ग्रामपंचायत सदैव प्रयत्न करत आहे. त्यांचे हे काम पाहून तालुक्यातील तरुणांना त्यांचा अभिमान वाटत आहे. आज माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा उपसरपंच बालाजी चुकलवार यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.