कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज दि .१ मे रोजी कंधार तहसील कार्यालय येथे ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथील ध्वजारोहण करण्यात आले . दरम्यान उत्कृष्ट लेझीम खेळून मनोरंजन व आपल्या विविध कलागुणाचे दर्शन करणाऱ्या कंधार येथील प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळेचे लेझीम पथकाचे व कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विघालयाच्या विद्यार्थिनींनी सुंदर असे सामुहील राष्ट्रगित सादर केल्याबदल श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या .
सर्वत्र सदरील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्षणाचे कौतुक होते आहे . यावेळी एस डी ओ डॉ. शरद मंडलीक , तहसिलदार अनुपसिंग यादव ,माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे , माजी सभापती संभाजी पाटील केंद्रे , माजी नगराध्यक्ष रामराव पवार , नपा मुख्यकार्यकारी अधिकारी कारभारी दिवेकर , Dysp थोरात साहेब, Pi पडवळ साहेब , माजी केंद्र प्रमुख बालाजी डफडे , मन्मथ थोटे राजहंस शहापुरे , सर्व राजकीय पुढारी व तहसिल चे कर्मचारी ,
शाळेचे मुख्याध्यापक भास्कर पाटील कळकेकर व शाळेतील सौ .वारगडे एस . व्ही , सौ बडजाते ए.एच , ताटे व्ही.बी.,गौंड ए.व्ही , उपरे एस .ए.,धनपलवार व्ही .ए.,सर्व शिक्षकांचे यावेळी कौतुक करण्यात आले .आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना व शिक्षकांशी संवाद साधला .
यावेळी महाराष्ट्र राज्य मान्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे वतीने राजहंस शहापुरे , मोहंमद अन्सारोद्दीन , वाघमारे डी जी .,ए जी मुंडे , शिवकुमार बच्चुवार आदीनी शुभेच्छा दिल्या .