परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

कंधार ; गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा′
परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज येथील शिक्षक व विद्यार्थ्यानी वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ म्हणून विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देउन त्यांचे कौतुक करण्याच्या उद्देश्याने हा गुणगौरव सोहळा महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून 1 मे सोमवार 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये इंग्लिश ओलंपियाड, सायन्स ओलंपियाड आणि बीडीएस सारख्या अतिशय महत्त्वपूर्ण परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे.

 

याच परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्राँझ मेडल प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. सैनिकी स्कूल व 8वी नवोदय साठी निवड झालेल्या मुलांचाही सत्कार करण्यात येणार आहे. अशाच प्रकारच्या बऱ्याच पारितोषकाचे वितरण या कार्यक्रमांमध्ये करण्यात येणार आहे.

म्हणून सर्व पालकांना सुचित करण्यात येते की दिनांक 1 मे 2023 रोजी आपण शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचा घटक व्हावा.

स्थळ : श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय पेठवडज
वेळ सकाळी 11 ते 2
विनीत
*परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *