१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.प्रत्येक सण हा मराठी माणसाला एक संदेश देऊन जातो.हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेेेेल्या हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो अनेक नेत्यांनी महापुरुषांनी महाराष्ट्राचे विविध उपाधी देऊन कौतुक केले आहे. पण आपल्या महाराष्ट्र राज्याचा खरच विकास झाला आहे का ? हा विचार आपण करायला हवा.कोणत्या गोष्टी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येतात त्या गोष्टीचा विचार करायला हवा. बेरोजगारी, भ्रष्टाचार ,गरिबी, मुलींवरचे अत्याचार या गोष्टींचा नायनाट केला पाहिजे.पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवली पाहिजे आणि प्रगतीची नवी शिखरे करण्याचा निर्धार केला पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन महाराष्ट्राची यशो गाथा ,महाराष्ट्राची शौर्य कथा ,पवित्र माती लावू कपाळी ,धरती मातेच्या चरणी माथा जय महाराष्ट्र….
महाराष्ट्र आपली ऐतिहासिक ,सांस्कृतिक ,सामाजिक कार्यकर्तुत्व ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज याच मातीत जन्मले आणि वाढले.त्यांनी संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. त्यांच्या विचारांवर आजही महाराष्ट्र स्वाभिमानाने ताठ उभा आहे. महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जनजागृतीचे काम केले.यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले. लेखक ,कवी ,साहित्यिक यांनी आपल्या लेखनातून महाराष्ट्राला चांगला संदेश दिला. अशी माणसे आपल्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आली हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य आहे.आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करावयास हवा. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा………
-श्रीकांत संभाजी मगर
नांदेड
९६८९११७१६९