कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक अर्थसहाय्याच्या विशेष योजनेंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीावेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ/विधवा/दिव्यांग निवृतीवेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना राबविल्या जातात. दिव्यांग, वयोवृध्द, अनाथ बालके, दुर्धर आजारी व्यक्ती, एकल महिला इत्यादी हे या योजनेचे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना त्यांचे पोस्ट्/बॅंक खात्यात दरमहा व राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेचे एक रक्कमी अर्थसहाय्य वितरीत करण्यात येते. दरवेळी या लाभार्थ्यांना पोस्ट/ बॅंकेत जाणे शक्य होईलच असे नाही. त्याचप्रमाणे त्यांचे घरापासून बॅंकेचे अंतर, बॅंकेतील गर्दी अशा विविध कारणांमुळे अर्थसहाय्य काढतांना लाभार्थ्यांचे श्रम, वेळ व पैसा खर्च होतो व त्यांना कष्ट पडतात. हा वर्ग वृध्द, निराधार दुर्बळ असल्यााने मानवतावादी दृटीकोनातून पाहणे गरजेचे आहे.
अशा परिस्थितीत मा.अभिजित राऊत, जिल्हाधिकारी नांदेड यांच्यान संकल्पनेतून भारतीय पोस्टे खात्यांमार्फत राबविण्यात येणारे “आपली पेंशन आपल्या दारी” हे अभियान या लाभार्थ्यांसाठी लाभदायक ठरणार असून हे अभियान कंधार तालुक्याात 01 मे (महाराष्ट्र दिन) पासून राबविण्यात येणार असल्याचे श्री अनुपसिंह यादव परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसिलदार कंधार यांनी सांगीतले.
या अभियांनातर्गत लाभार्थ्यांचे पोस्ट/बॅंक खात्यात जमा असलेले अर्थसहाय्य इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंकेचे कर्मचारी लाभार्थ्याचे घरी जावून आधार क्रमांक पडताळणी आधारीत प्रक्रीयेने Adhar Enabled Payment System (AEPS) लाभार्थ्यांना अर्थसहाय्य अदा करणार आहेत. याबाबत दिनांक 01 मे 2023 रोजीच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विशेष ग्रामसभेच्या बैठकीत इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंक (IPPB) च्या “आपली पेंशन आपल्या दारी” अभियानाबाबत गावपातळीवर व्यापक जनजागृती करणेसाठी विशेष ग्रामसभेत याबाबत विषय ठेवून जनजागृती करून लाभार्थ्यांना प्रेरीत करण्याबाबत गटविकास अधिकारी व त्यांच्या अधिनस्त सर्व ग्रामसेवक यांना परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी श्री अनुपसिंह यादव तहसिलदार कंधार यांनी आदेशीत केले आहे.
तसेच कंधार तालुका पोस्ट मास्तर, कंधार तालुक्यातील सर्व पोस्ट कर्मचारी यांना तात्काळ अशा लाभ मिळणा-या लाभार्थीचे पोस्ट पेमेंट बॅकेचे खाते काढण्याचे आदेश दिले आहेत. मा.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या या निराधाराविषयी आपुलकीच्या अभियानाच्या व्यापक जनजागृतीसाठी मंडळ अधिकारी,विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक,पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहाय्य करण्यांबाबत प्रशासनाने सुचना केलेल्या आहेत.
मा.जिल्हाधिकारी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प “आपली पेंशन आपल्या दारी” हे अभियान प्रत्यक्षात राबविण्यासाठी मा.निवासी जिल्हाधिकारी तथा विशेष सहाय्याचे नोडल अधिकारी संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी कंधार डॉ.शरद मंडलीक यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील विशेष सहाय्य कक्षाच्या प्रमुख तहसिलदार ज्योती चौहान व त्यांच्या सहाय्यक माधुरी शेळके यांच्या मदतीने कंधार तालुका प्रशासन जोरकस प्रयत्न करत आहे.
तरी कंधार तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी “आपली पेंशन आपल्या दारी” या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिविक्षाधिन उपजिल्हाीधिकारी तथा तहसिलदार श्री अनुपसिंह यादव यांनी केले आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी कंधार तथा संगांयो शासकीय सदस्य मांजरमकर, मुख्याधिकारी संगांयो शासकीय सदस्य दिवेकर, संगायो शाखेचे नायब तहसिलदार श्रीमती नयना कुलकर्णी, अव्वल कारकून माधव पवार, महसूल सहाय्यक बारकुजी मोरे, मुख्य पोस्ट अधिक्षक राजीव पाळेकर व आय.पी.पी.बी.चे सत्यप्रभु, प्रगत वानखेडे, डी.आर.नटवे, तालुका पोस्टमास्तर एम.जी.केंद्रे व कंधार तालुक्यातील सर्व महसूल, ग्रामविकास विभाग व पोस्ट कर्मचारी हे परिश्रम घेत आहेत.