कंधार ; प्रतिनिधी
बाबुळगाव तालुका कंधार येथील जवान भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले संदीप बालाजी केंद्रे यांचे गतवर्षी निधन झाले , कमी वयामध्ये देशसेवा घडवून मातृभूमीच्या सेवा करणाऱ्या संदीप केंद्रे यांचे गतवर्षी निधन झाले, त्यांचे स्मारक व्हावे अशी सर्व गावकऱ्यांची मागणी होती त्याचे दखल घेऊन नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तीन लक्ष रुपये निधी मंजूर केला .
मंजूर निधीतून होणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबुराव केंद्रे यांच्या हस्ते १ मे रोजी महाराष्ट्र दिनी नारळ फोडून भूमिपूजन करण्यात झाले यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भगवान राठोड शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार ,सरचिटणीस मधुकर डांगे ,यांच्यासह सरपंच प्रतिनिधी रामदास गीते, उपसरपंच संभाजी गीते, रामराव चक्कलवाड, जवान संदीप केंद्रे यांचे वडील बालाजी केंद्रे ,अवधूत बोरोळे, हरिभाऊ जेलेवाड ,उद्धवराव गायकवाड ,नामदेव मुंडे ,दिगंबर गीते, उल्हास राठोड ,नारायणराव बारोळे, गोविंद बारोळे, राजीव गीते ,संतोष बारुळे, मुख्याध्यापक यु के राठोड ,एन डी पंदीलवाड, एल जी डांगे, एस जी यांची केंद्रे ,ए जी डांगे, एन जी जायभाये, सौ जे एस चोले यांच्यासह मोठ्या संख्येने बाबुळगाव येथील नागरिक उपस्थित होते