कंधार : प्रतिनिधी
कंधारचे भूमिपुत्र एका सामान्य कुटुंबातून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंडी तालुका लोहा येथील एक उपक्रमशील शिक्षक यांनी नोकरी लागल्यापासून सतत उल्लेखनीय कार्य चालू ठेवले व त्यासोबत स्वतःचे ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आपले उच्च शिक्षण चालू ठेवले एच .एस. सी, डी . एड नंतर प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीवर लागलेले त्यानंतर स्वतः त्यांनी नोकरी करत बीए ,एम ए मराठी, एम ए इतिहास, बीएड, बीए इंग्लिश ,एम ए इंग्लिश, एम एड गोल्ड मेडल ,असे उच्च शिक्षण घेतले व 29 .11. 2017 ला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे शिक्षण शास्त्र विषयात पीएचडी चे रजिस्ट्रेशन केले आणि मार्गदर्शक डॉक्टर सुनंदा गोपीनाथराव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली *नांदेड जिल्ह्यातील भटक्या जमातीतील लोकांच्या शैक्षणिक विकासाचा अभ्यास* या विषयात संशोधन कार्य पूर्ण करून दिनांक 8.5. 2023 रोजी त्यांना शिक्षण शास्त्र संकुलाचे चेअरमन डॉक्टर सिंकू कुमार सिंग आणि बहीस्त परीक्षक डॉक्टर सदानंद भिलेगावकर यांच्यामार्फत मुख्य तोंडी परीक्षा घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने पीएच.डी ही पदवी प्रदान करण्यात आली याप्रसंगी त्यांचे मित्र ,शिक्षक परिवार, नातेवाईक या सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे त्यांना त्यांच्या या यशस्वी योगदानाबद्दल हार्दिक शुभेच्छा.