मान्सून पूर्व साथीचे आजार व १६ मे २०२३ डेंग्यू दिन -काळजी घेण्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लोणीकर यांचे आवाहन

 

कंधार:-महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचनालय,पुणे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांचे पत्र व आदेशानुसार पावसाळ्याच्या तोंडावर साथरोग परिस्थितीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक ते मान्सून पूर्व तयारी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुर्यकांत लोणीकर यांनी तीव्र स्वरूपाचा उन्हाळा आहे त्याअनुषंगाने कंधार शहरातील वॉर्ड निहाय पाहणी करून मान्सून पूर्व तयारी करण्यासाठीच्या उपाय योजना करण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद कंधार येथे पत्र देऊन त्यांना कळविण्यात आले आहे .तसेच मान्सून ओण जवळ येत आहे त्यामुळे कंधार शहरातील जवळपास २० वार्डामध्ये नियमित स्वच्छता करून घ्यावी व घनकचरा यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावे, तसेच कंधार शहरातील जनतेला पिण्याचे पाणी दररोज शुद्धीकरण करूनच पाणीपुरवठा करण्यात यावा.तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारे ब्लिचिंग पावडर, तुरटी जवळजवळ ०३ महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा. उपलब्ध झालेला साठा योग्य प्रकारे साठवून ठेवावा ब्लिचिंग पावडर ओल्या ठिकाणी ठेवू नये कारण त्यातील क्लोरीनचे प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी व पाणी शुद्धीकरण करणारे कर्मचारी यांचे पुन्हा प्रशिक्षण घ्यावे कारण शहरातील वॉल गळती, नळ गळती, पाईपलाईन लीकेजेस असणारे दुरुस्ती करून घेण्यात यावे जेणेकरून पिण्याचे पाणी अशुद्ध होणार नाही.

*अशुद्ध पाणि पुरवठ्यामुळे होणारे आजार*

कॉलरा ,टायफाईड, गॅस्ट्रो, कावीळ ,विषमज्वर जलजन्य आजाराची साथ पसरणार नाही.
कंधार शहरातील नाल्या वाहत्या करणे व पडलेले खड्डे बुजवणे घेणे व धूर फवारून घेणे त्यामुळे जनतेचे आरोग्य अबाधित राहील .कंधार शहरातील प्रत्येक वॉर्डात धूर फवारणी करून घ्यावे व नाल्या साफ करून घेणे त्यामुळे डास होणार नाहीत डासांमुळे अनेक आजारांना बळी पडू शकतो .
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी रुग्णालयाची टीम केलेली आहे प्रत्येक गल्ली वॉर्ड नगर मध्ये आबेट व फवारणी करण्यासाठी नगरपरिषद कंधार येथे मा. मुख्याधिकारी साहेब यांना पत्र दिले आहे डेंग्यू रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्येक गल्ली नगर मध्ये आबेट पाण्यामध्ये टाकून त्यांना सूचना देणार आहेत व कोरडा दिवस पाळण्यासाठी मागर्दशन करणार आहेत ,रमाईनगर , पत्रकार कॉलनी, भिमगड , महात्मा फुले हौसिंग सोसायटी ,एकनाथ नगर, संभाजी नगर, विजयगड, भवानी नगर, या
यरिया मध्ये आबेटींग करण्यात येणार आहे व्यंकटेशनगर, अभिनव नगर , सहयोग नगर डेंग्यू हा आजार “एडिस इजिप्टाय” डासांमुळे उद्भवतो.या आजाराला आपण आपल्या परिसराची अस्वच्छता यातूनच निमंत्रण देतो.हा आजार केवळ डासांमुळे होत असल्यामुळे यावर प्रभावी उपाय म्हणजे परिसराची स्वच्छता हाच होय.”एडिस इजिप्टाय” डास होण्याच्या घरातील आसपासच्या जागा नागरीकांनी सतत स्वच्छ करणे आवश्यक आहे.आरोग्य साक्षरतेसाठी व सुरक्षित आरोग्यासाठी नागरिकांचा अधिक अधिक सहभाग वाढवा .

*डेंग्यू तापाचे लक्षणे खालील प्रमाणे आहेत*
16 मे डेंग्यू दिवस

अंगदुखी, ताप, उलट्या, जुलाब,मळमळ,असे असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनामध्ये अधिक दडपण भीती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आरोग्याचे नाही ते संकट आपण स्वतः होऊन ओढुन घेण्यापेक्षा आपल्या घरातील व परिसरातील पाणी साचणाऱ्या जागा शोभेच्या कुंड्या घरातील कुंड्या पाणी साठवूनूकीचे पात्र हौद, स्वच्छ करून एक दिवस त्या कोरड्या ठेवल्या तर यावर १००%आळा बसू शकतो
पावसाळ्यात जुलाब लागणे, उलटी होणे,हे जीवन दुषित आहे….’
ताप येणे, डेंगू, मलेरिया आदी साथीचे रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी साथीचे रोग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी केले आहे.
डासांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी घर व परिसरात पाण्याचे साठवण होणार नाही. पाण्याचे खड्डे तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. पाणी साठविण्यासाठी हौद, टॅक स्वच्छ धुवून घ्यावेत. निर्जंतुकीकरण करावे. घरातील बोर व इतर स्रोत पाण्याचे तपासणी नमुने भूजल तपासणी प्रयोगशाळा येथे पाठवावे. उघड्यावरचे अन्न, शिळे पदार्थ ,मास मटण,खाऊ नयेत. पाणी निर्जंतुकीकरण करूनच करण्यासाठी गरम पाणी उकळून घ्यावे. सोडियम हैपोसोल्युशन, ब्लेचिंग पावडर, त्रुटीचा वापर करून पाणी निर्जंतुकीकरण करून घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालय, धार्मिकस्थळे यांनी विशेष लक्ष ठेवावे. पाणी नमुने तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी घरगुती परिसरातील कचरा वेळोवेळी नगरपालिकेच्या वाहनाद्वारे विल्हेवाट लावावी. जने करून घर व परिसर स्वछ राहिल. यामुळे साथीचे रोग होणार नाहीत.
मान्सून पूर्व साथीचे रोग टाळण्यासाठीच तयारी याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी कंधार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगरसेवक यांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासंदर्भात कळविले आहे. डेंगु सदृश्य तपासणी व औषध साठा उपलब्ध आहे तरी कंधार शहरातील जनतेनी घाबरून न जाता कंधार ग्रामीण रुग्णालयात येऊन आपली तपासणी करून घ्यावी आणि सहकार्य करावे डेंग्यू सारखे जीवघेणे आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन डॉ लोणीकर यांनी कंधार शहरातील सर्व जनतेला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *