(नांदेड) ;
उमरी येथे प्रज्ञावंत, यशवंत, कीर्तीवंत,शिलवंत स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा ३६६ वा जन्मोत्सव मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड, छावा क्रांतिवीर सेना उमरी यांच्या वतीने व्याख्यानाच्या मेजवानीसह विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. प्रसिद्ध व्याख्याते रमेश पवार यांचे प्रबोधनात्मक सुंदर व्याख्यान झाले. यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमरी पंचायत समितीचे मा.सभापती शिरीष गोरठेकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून इंजि शे.रा.पाटील सर, जिल्हाध्यक्ष उद्धवराव पाटील सुर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग पाटील गोरठेकर, बापुसाहेब कौडगावकर,संजयजी कुलकर्णी, संदीप पाटील कवळे,राजु अण्णा,पारसजी दर्डा, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी बी.व्ही.चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
व्याख्याते रमेश पवार यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग, समर्पण, विपुल ग्रंथ संपदा, जगातील आदर्श सर्वोत्तम पुत्र कसे आहेत हे अनेक उदाहरणांसह सांगत छ.संभाजी महाराज यांचे बत्तीस वर्षाचे अगदी कमी अल्पायुषी जीवन व जीवनातील संघर्ष सांगत आजच्या तरूणांनी त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन जीवनात मार्गक्रमण करावे असे सांगितले.
संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष तथा नवतरुण उद्योजक शिवश्री गोविंद पाटील ढगे यांनी त्यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत १११११रुपये मराठा सेवा संघ मुलींच्या वसतिगृहास शिवदान दिले.तसेच शिवश्री प्रभाकर पाटील कदम शेलगावकर यांनी वाढदिवसानिमित्त कदम परिवार शेलगावकर यांच्या वतीने ५०००रुपये व शिवश्री बालाजी पा. ढगे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ५०००रुपये शिवदान मराठा सेवा संघ मुलींचे वसतीगृह नवा मोंढा नांदेड वसतिगृहास देण्यात आले..
त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले व इतरांनीही आपापल्या परीने सेवा संघाच्या वस्तीगृहासाठी शिवदान करावे असे आवाहन केले..
त्यानंतर विचारपिठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत बालाजी पाटील यांचा वाढदिवस साजरा करुन सर्वांनी त्याना शुभेच्छा दिल्या.मराठा सेवा संघ मुलींचे वसतीगृहाबाबत विस्तृत माहीती देण्यात आली. मराठा संवाद यात्रा, आजीवन सभासद, वार्षिक सभासद, मराठा मार्ग सभासद, ग्राम शाखा,जिजाऊ सृष्टी निधी सिंदखेड राजा आदी विषयांवर चर्चा होवून तालुका नूतन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली.यावेळी मराठा सेवा संघ उमरी तालुका अध्यक्ष पदी एकमताने शिवश्री पंतगे सर यांची बिनविरोध निवड करण्यातआली मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उद्धवराव पाटील सुर्यवंशी यांनी मराठा सेवा संघाचे कार्य व राबविण्यात येत असलेले उपक्रम यावर सखोल मार्गदर्शन करून नूतन तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली…