माळाकोळी ; एकनाथ तिडके
मागील काही दिवसापासुन माळाकोळी ते आष्टुर डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे मात्र सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे तातडीने काम संपवण्याच्या घाईगर्दीत रस्ता कामाबरोबरच उखडत असल्याचे दिसत आहे याबाबत संबंधित कंत्राटदारास चौकशी केली असता कंत्राटदार सामान्य नागरिकांना धमक्या देत आहे त्यामुळे संबंधित कामाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून योग्य कार्यवाही करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते तथा खासदार चिखलीकर यांचे निकटवर्तीय परमेश्वर मुरकुटे यांनी केली आहे.
कंधार ते आष्टुर या रस्त्याचे नूतनीकरण व डागडुजी साठी तीन कोटी 22 लक्ष रुपये बजेट असून या रस्त्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून अतिशय निकृष्ट होत असल्याची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे कार्यकर्ते परमेश्वर मुरकुटे यांनी संबंधित कामाच्या ठिकाणी भेट दिली व पाहणी केली असता सदर रस्ता डांबर न वापरता व अंदाजपत्रकाच्या नुसार केला जात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी त्यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून सदर रस्त्याची पोल-खोल केली व संबंधित कंत्राटदाराला याबाबत चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या असता कंत्राटदाराने उलटपक्षी परमेश्वर मुरकुटे यांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या, असल्याची माहिती त्यांनी दिली.
महा विकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद असल्यामुळे जिल्ह्यातील रस्ते अतिशय सुंदर व योग्य दर्जाचे होतील अशी अपेक्षा नागरिकांची होती मात्र राजकीय वरदहस्त असल्याचे सांगत कंत्राटदार काम निकृष्ट करत आहेच , शिवाय याबाबत चौकशी करणाऱ्या नागरिकांना गुन्हे दाखल करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. संबंधित कंत्राटदार वादग्रस्त व्यक्ती असून डांबर घोटाळ्यातील त्यांच्यावर गुन्हे आहेत या कंत्राटदाराचे कुठलेही काम योग्य पद्धतीने व व दर्जेदार नसते,अशी माहिती परमेश्वर मुरकुटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली शिवाय आपण याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन रितसर तक्रार देणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी परमेश्वर मुरकुटे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माळाकोळी आष्टुर, या रस्त्याच्या डागडुजी साठी दरवर्षी शासनाचे लाखो रुपये येतात मात्र काम पूर्ण झाल्यानंतर सदर रस्ता महिनाभर सुद्धा वापरण्यायोग्य राहत नाही, यामुळे शासनाचे करोड रुपयेपाण्यात घातले जातात या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून काम चांगले करावे .केवळ गुत्तेदाराच्या फायद्यासाठी शासकीय निधीचा वापर होणार नाही.संबंधित कंत्राटदाराची योग्य चौकशी करूण जास्तीच्या रहदारीचा असलेल्या आष्टुर रस्ता योग्य पद्धतीने पूर्ण करण्यात यावा अशी मागणी केली आहे .