कोरोना महामारीचा वायरस कोवीड-19 यांस,
माझा नमस्कार!
स.न.वि.वि…
हल्लीचा कालखंड महामारीचा असल्याने मला ओहर टाईम करावा लागत असल्याने माझे कुटुंब जाम वैतागले आहे.कारण मला माझ्या घरच्यांना वेळ देणे दुरापास्त झाले आहे.
मला कोविड-19 विषाणुलाच पत्र लिहून गर्हाणे मांडून माझी यातना कथन करावे वाटले म्हणुन हे पत्र लिहित आहे.
आज पर्यंत मला पुर्वी फक्त आणि फक्त पटकी या आजारात ओहर टाईम करावा लागला होता.तो कालखंड 20 ते 30 च्या दशका आधीचा होता.
त्यावेळी एका मानवाचा स्मशानात अंत्यविधी होतांना गावात एक-दोन तरी जणांनांचा प्राण नेण्यासाठी मला ओहर टाईम करावा लागत होता.
म्हणुन तेंव्हा पासून अंत्यविधीला गेलेला व्यक्ती स्मशानातून घरी परतल्या नंतर अंघोळ केल्या शिवाय त्या व्यक्तीला घरातले सदस्य घरात येवू देत नव्हते.त्यांचे कारण म्हणजे त्या मृत व्यक्तींच्या अंगावरील जिव-जंतू अंत्यविधीस गेलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून घरात येवून घरातील सदस्यांना त्या पटकी रोगाचा प्रार्दुभाव होवू नये म्हणून खबरदारी घेत असत
.त्या परिस्थितीत मला मानवांचा प्राण नेण्यासाठी ओहर टाईम करावा लागला होता.त्यावेळी जागतिक स्तरावर पटकी रोगावर विज्ञानाच्या जोरावर नियंत्रण मिळवले.त्या वेळी जगातील सर्व राष्ट्रे त्यावेळच्या परिस्थितीने गांगरुन केली होती.
त्या नंतर माझ्या वरील कामाचा तान कमी झाला.जवळपास शतकाचा कालखंड गेला.मला नैसर्गिक मृत्यू शिवाय एखाद दुसरा वाहनांचा वा भुकंप,महापूर,शेतकरी आत्महत्या,वीज अंगावर पडून अपघात,वादळ,त्सुनामी,दंगल अशा अपदा झाल्यावर तर ओहर टाईम करावा लागतो.हा दिनक्रम होता.
आज घडीला कोरोना महामारीच्या काळात कोवीड-19 हा वायरस अख्या जगाला दहशतीखाली ठेवत आहे.जवळपास 200 पेक्षा जास्त देशांना आपल्या विळख्यात घेतल्यागत भासत आहे.जगभरात जवळपास करोडो लोकांचा मृत्यू झाला आहे. 24 कोटी पेक्षाही जास्त लोकांना संसर्ग झाला आहे.83 लक्षा पेक्षा जास्त लोकांचे प्राण नेण्याचे कार्य आजपर्य॔त या कोरोना महामारीत
प्रस्त जगाच्या मानाने कमी आहे.या देशाचे हवामान सध्याच्या काळात उन्हाळ्याचा असल्यामुळे या फायदाच झाला.लाॅक डाऊनच्या काळात देवांची मंदिरे,प्रार्थनांच्या मशिदी,प्रेअरची चर्च,ध्यान साधनांची विहारे या काळात कुलूप बंद आहेत.मानवांतील डाॅक्टर, पोलिस,नर्सेस,फार्मासिस्ट,सफाई कामगार,प्रकाशदुत,बॅकेतील सेवाचार्य,महसूल विभाचे सेवाचार्य,महानगर पालिका,नगरपालिका,ग्राम पंचायतीचे सर्व सेवाचार्य या संकट समयी आपली सेवा बजावून देशभक्ती करत आहेत.माझ्या ओहर टाईममुळे माझी पत्नी धुमोरना व मुलगा कतिला मला प्रश्न विचारतात तुम्हाला रोजच उशीर होत आहे.उशीर होण्याचे कारण त्यांना सांगताच ते सुध्दा उदभवलेल्या परिस्थितीने चिंताक्रांत झाले.आम्हाला काय माहिती आम्ही सहजच उशीर होत असल्यामुळे हा प्रश्न विचारला.आणखी दोन-चार महिने मला ओहर टाईम करावा लागेल असे संकेत आहेत.माझी हात जोडून सर्व मानव जातीस हात जोडून विनंती करतो की लाॅक डाऊन आदेशाचे 100%अनुकरण करुन कोरोना या महामारीला हद्दपार करावे.
ही माझी नम्र विनंती.
आ.वि.
यमपुरीचा यमराज मृत्यूलोक
—————————————
शल्यकार- -दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा