सर्व पदाधिकारी आणि दोस्तहो,सप्रेम नमस्कार !-वरील विषयाला अनुसरून आपणा सर्वांना कळविण्यात येते की,
• लोकजागर पार्टीच्या प्रादेशिक,
विभागीय, जिल्हा पातळीवरील सर्व समित्या, विविध आघाड्या आणि त्यांच्या सर्व कार्यकारिणी आज दिनांक १ सप्टेंबर २०२० पासून भंग करण्यात आलेल्या आहेत. आजपासून पुढील नियुक्ती पर्यंत कुणीही पदाधिकारी असणार नाहीत.
-पुढील काळात येणारी सामाजिक आणि राजकीय आव्हानं लक्षात घेता, पक्ष संघटन जास्तीत जास्त व्यापक व्हावे, घटनात्मक पद्धतीनं बांधणी व्हावी आणि पक्षाचा विस्तार करताना अंतर्गत सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं, विभागीय समतोल साधला जावा, या हेतूने वरील निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यानंतरची पक्षाची संघटनात्मक विभागणी आणि बांधणी खालील प्रमाणे असेल. प्रत्येक विभागीय कार्यकारिणी स्वायत्त / स्वतंत्र राहील.
#महाराष्ट्राचे_विभाग
मुंबई विभाग• मुंबई महानगर पालिका क्षेत्र• सहा लोकसभा मतदार संघ-
कोकण विभाग ( ५ जिल्हे )• ठाणे• पालघर• रायगड• रत्नागिरी• सिंधुदुर्ग-
पश्चिम महाराष्ट्र ( ५ जिल्हे )• पुणे• कोल्हापूर• सांगली• सातारा• सोलापूर
त्तर महाराष्ट्र ( ५ जिल्हे )• नाशिक• अहमदनगर• धुळे• नंदुरबार• जळगाव-
मराठवाडा ( ८ जिल्हे )• औरंगाबाद• जालना• परभणी• हिंगोली• नांदेड• बीड• लातूर• उस्मानाबाद-
पश्चिम विदर्भ ( ५ जिल्हे )• अमरावती• यवतमाळ• अकोला• वाशीम • बुलढाणा-पूर्व विदर्भ ( ६ जिल्हे )• नागपूर • वर्धा• चंद्रपूर• गडचिरोली• भंडारा• गोंदिया-महानगर पालिका विभाग• मुंबई वगळता
इतर सर्व ठिकाणच्या महानगर पालिका असलेल्या शहरांना पक्षाच्या घटनेप्रमाणे स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता दिलेली आहे.• मुंबई महानगर पालिकेला मात्र स्वतंत्र प्रदेश किंवा विभाग असा दर्जा देण्यात आलेला आहे.-
वरील प्रमाणे महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग कार्यरत असतील.
त्या त्या विभागासाठी स्वतंत्र विभागीय समित्या / कार्यकारिणी असतील. आणि त्या सर्व समित्या थेट महाराष्ट्र प्रदेश समितीला सलग्न असतील. उत्तरदायी असतील. -महाराष्ट्र प्रदेश लोकजागर पार्टीची स्वतःची एक स्वतंत्र संयोजन समिती असेल. तीच महाराष्ट्राची सर्वोच्च कार्यकारिणी असेल. ती केंद्रीय अध्यक्षांना सलग्न आणि उत्तरदायी असेल.
अध्यक्षांचा निर्णय अंतिम असेल. -प्रदेश समितीची रचना ( कार्यकारिणी ) पुढील प्रमाणे असेल -प्रदेश संयोजन समिती • संयोजन समिती सदस्य ११• संघटन सचिव – १• सहाय्यक संघटन सचिव – ७ ( प्रत्येक विभागासाठी एक याप्रमाणे ) • प्रत्येक विभागाचे संयोजक आणि संघटन सचिव हे प्रदेश संयोजन समितीचे पदसिद्ध सदस्य असतील.-विभागीय समिती • संयोजक – १• संघटन सचिव – ५• सहाय्यक संघटन सचिव( प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे )• संयोजन समिती सदस्य – ११• प्रत्येक जिल्ह्याचे संयोजक व संघटन सचिव हे विभागीय संयोजन समितीचे पदसिद्ध सदस्य असतील.-जिल्हा समिती• जिल्हा संयोजक – १• जिल्हा संघटन सचिव – २• सहाय्यक संघटन सचिव( प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे )• संयोजन समिती सदस्य – ११• प्रत्येक तालुक्याचे संयोजक आणि तालुका संघटन सचिव हे पदसिद्ध सदस्य असतील.-• हेच सूत्र तालुका कार्यकारिणी साठीही लागू राहील • याच सूत्रानुसार युवा लोकजागर, विद्यार्थी लोकजागर, शिक्षक लोकजागर, उद्योग लोकजागर इत्यादी आघाड्यांची रचना राहील.-आजपर्यंत पार्टी वाढविण्यासाठी आपण जे सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार !
सारे मिळून नव्या दमाने, एक परिवार म्हणून काम करू या !
#ओबीसी_ मुख्यमंत्री_बहुजन_सरकार..हे स्वप्न साकार करू या !
सर्वांना शुभेच्छा !
आपला,*ज्ञानेश वाकुडकर*
संस्थापक अध्यक्ष
*लोकजागर पार्टी*
-नागपूर
दिनांक ०१/०९/२०२०