कंधार ; प्रतिनिधी
नांदेड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या ग्रामीण कंधार तालुका प्र अध्यक्ष पदी युवा कार्यकर्ते ऍड अंगद केंद्रे यांची निवड करण्यात आली असून त्यांना
जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .
अंगद केंद्रे हे गेल्या विस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करतात , यापूर्वी त्यांनी कंधार तालुका युवक उपाध्यक्ष , ओबीसी सेल प्रदेश सचिव ,कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक अशी अनेक पदावर कार्य केले आहे .जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी अंगद केंद्रे यांच्या सामाजिक व पक्षातील राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांची कंधार तालुका प्रभारी अध्यक्ष पदी निवड केली आहे .
यापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा खा शरदचंद्रजी पवार , प्रदेशअध्यक्ष माननीय ना. जयंतराव पाटील . माननीय मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्न शील व पक्ष बळकटी साठी व पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी एक निष्ठेन काम करणार असल्याची माहिती ऍड अंगद केंद्रे यांनी दिली .