राग नाही… कीव येते.

ट्रोलींग आम्हा कलाकारांना नवीन नाही.. पण लोक व्यक्त होण्याची घाई करतात हे वाईट आहे.. मी अनेकदा लेखात लिहीलय जमलं तर चांगलं लिहा नाहीतर शांत रहा..अनेकदा रंगावरून ,बॉडी शेमींगवरुन किवा वयावरुन वाईट शब्द आपल्याकडुन वापरले जातात जे उलटुन एक दिवस आपल्याकडे परत येतात मग त्यावेळी आपल्याला होणारा त्रास हा त्या व्यक्तीलाही आपण दिलेला असतो..
मी दुर्लक्ष करते किवा पुरूष हृदय लिहुन मोकळी होते पण इतर सगळ्याकडे ही कला असेलच असं नाही.. आताच एका व्हीडीओवर मेसेज पाहिला फिल्टर वापरला आहे फिल्टरचा उपयोग नक्की कुठे होतो हे मला फार माहीत नाही पण जेव्हा एखादी व्यक्ती व्यायामाने शरीर कमावते तेव्हा रिकामटेकड्या किवा आळशी लोकांनी त्यावर आपली प्रतिक्रिया देउ नये..
मेहनत काय असते हे शेतकऱ्याला उन्हात राबल्यावर कळते तसेच जीम किवा ट्रेक करुन आल्यावर समोर गुलाबजाम दिसत आहेत पण खायचे नाहीत हे कलाकाराला माहीत असते म्हणजेच त्याने ठेवलेला सय्यम हा खुप मोठा असतो..ती जाडी , ती काळी , ती म्हातारी कीती सहज बोलुन मोकळे होता.. त्यापेक्षा उत्तम वाचा.. वाचलेलं आपल्यात उतरवा आणि आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा..
लैगिकतेवर लिहीताना किवा बोलत असताना जेव्हा आपल्या जवळच्या माणसांची इच्छा असते की हे काम मी करु नये तेव्हा त्यांच्या विचारांची कीव करावी वाटते.. एका साच्यात जगत असताना आजूबाजूचे जग खुप वेगळे आहे याबद्दल जाणून घेण्याची मानसिकता या उच्चशिक्षीत लोकांकडे नसते ही आपली शोकांतिका आहे.. नक्की यांच्यामते सुसंस्कृत , संस्कारी , याचा अर्थ काय हे त्यांनाही कळत नसावे..

 

 

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *