मी दहावी ते बारावी नि बी.एस्सी पर्यंत शिक्षणासाठी असतानाची ही गोष्ट. कालखंड 1981 ते 1987. माझे आठवी पासून ते बी.एस्सी पर्यंत कंधार येथे शिक्षण झाले. राहायचे ठिकाण साठेनगर, कंधार. त्यादरम्यान कंधार, मुखेड, बिलोली इतर तालुक्यातील दोनशे ते तीनशे विद्यार्थी कंधार येथील ITI, JTI नि वेगवेगळ्या शाळा- महाविद्यालयामध्ये शिकत होती. ती सर्व मातंग समाजाची मुले, साठेनगर, फुलेनगर, कंधार येथे रूम करून आणि हाताने करून खाऊन नि विविध होस्टेलमध्ये राहून शिकत होती. आणि विशेषत्वाने आम्ही सर्व विद्यार्थी एकसंघपणे रहात होतो आणि मोहरक्यांचे ऐकतही होते. आम्ही म्हणजे मी, बाबू बसवंते, व्यंकट कपाळे, कांबळे, डॉ. माधव कणकावळे ( सध्या पुण्यात cs), शंकर माळगे स्मृतीशेष हनुमंत घोणशेठवाड, ज्ञानोबा भालेराव, निवृत्ती बसवंते, ज्ञानोबा बसवंते, किशन बसवंते, मरीबा बसवंते अशी अनेक – कित्येक आम्ही सर्व विद्यार्थी स्मृतीशेष प्रा. पी. एम.गायकवाड, प्रा. घोडजकर, स्मृतीशेष डी. बी. गायकवाड आणि इतर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र युवक परिषदमध्ये काम करायचो . त्याच दरम्यान नांदेडला मातंग समाज संघर्ष समितीचे काम ऍड.राम वाघमारे, दिगंबर घंटेवाड, पांडुरंग बाळातवाडीकर, विश्वनाथ वाघमारे, अशी अनेक नांदेड एम.आय.डीसीच्या शिफ्टा या कंपनीत काम करणारे समाजाचे अनेक कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती, स्मृतिदिन आणि वेगवेगळ्या मातंग समाजाच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय होतेच. या सर्वांना नांदेडमध्ये मार्गदर्शक म्हणून आय. पी. बसवंते ऍड.गोविंदराव बाराळीकर, घोडकरकाका, अशी समाजातील मातब्बर मंडळी या मातंग समाजाच्या प्रबोधनाच्या चळवळीला मदत करायची. मातंग समाजाच्या परिवर्तन आणि प्रबोधनाची चळवळ समाजामध्ये रुजावी म्हणून, नांदेड, एम.आय.डीसीतील कार्यकर्त्यांनी, अण्णाभाऊ – बाबासाहेबांची विचारधारा सोबत घेऊन, मातंग समाज प्रबोधनासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमाची अर्थात कलापथकाची टीम तयार केली होती. त्यात दिगंबर घंटेवाड, पांडुरंग बाळातवाडीकर, विश्वनाथ वाघमारे आणि इतर सर्व कलापथकातील कलावंत, कार्यकर्ते, आणि जयंतीतील भाषणकर्ते हीच मंडळी. खेड्यापाड्याने जमेल त्या वाहनाने कंधार, मुखेड, बिलोली तालुक्यातील खेड्यापाड्याने, अण्णाभाऊ-आंबेडकरांची विचारधारा कलापथकाच्या माध्यमातून समाजामध्ये वैचारिक विचाराची पेरणी केली . त्या चळवळीचा परिणाम समाजामध्ये अधिक काळ राहिला. परिणामी चवळीत नवीन कार्यकर्त्याची नवीन टीम निर्माण झाली. ती चळवळ आजही जिवंत आहे.
मी अकरावी ते बी.एस्सी पर्यंत साठेनगर कंधार येथेच खोली करून, मी, बाबू बसवंते, व्ही.एन. कपाळे राहायचो. आमची मार्गदर्शक प्राध्यापक सरही साठेनगर येथेच राहत होते. आमची खोली म्हणजे जी माझी सासरवाडी आहे. मोठाच्या मोठ्या, लांबच्या लांब घर आणि समोर भरपूर जागा. आमचे आत्याचे घर म्हणून आम्ही फुकटच, किराया न देताच राहात होतो . एम.आय.डीसीचे कलापथक कंधार तालुक्यात कुठेही आले तर आम्ही सगळे विद्यार्थी त्यांच्या समावेत,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती नि स्मृती निमित्त तालुकाभर फिरत होतो. त्या चळवळीत आग्रही म्हणून दिगंबर घंटेवाटची महत्त्वाची भूमिका राहायची, कलापथकातील ते महत्त्वाची भूमिका करायचे , जयंती कार्यक्रमात भाषणही करायचे. कंधारला मुक्काम असले की, ते कलापथक माझ्याच रूमवर थांबायचं. त्यामुळे नांदेड, एम.आय.डीसी येथील सर्व कार्यकर्त्यांची वैयक्तिक आणि कुटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. मी, ऍड.राम वाघमारे, कपाळे, सतीश कवडे , हनुमंत घोणशेठवाड, शंकर माळगे, पांडुरंग बाळंतवाडीकर, दिगंबर घंटेवाड विश्वनाथ वाघमारे, नि व्ही. एन. कपाळे,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती नि स्मृती निमित्त तालुकाभर फिरत होतो. त्या चळवळीत आग्रही म्हणून दिगंबर घंटेवाटची महत्त्वाची भूमिका राहायची, कलापथकातील ते महत्त्वाची भूमिका करायचे , जयंती कार्यक्रमात भाषणही करायचे. कंधारला मुक्काम असले की, ते कलापथक माझ्याच रूमवर थांबायचं. त्यामुळे नांदेड, एम.आय.डीसी′ येथील सर्व कार्यकर्त्यांची वैयक्तिक आणि कुटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. मी, ऍड.राम वाघमारे, कपाळे, सतीश कवडे , हनुमंत घोणशेठवाड, शंकर माळगे, पांडुरंग बाळंतवाडीकर, दिगंबर घंटेवाड विश्वनाथ वाघमारे, नि व्ही. एन. कपाळे, डी. बी. गायकवाड, प्रा.राजेश घोडजकर आणि एम.आय.डीसीतील कलापथकाची टीम. मातंग समाजाच्या प्रबोधनकार्यात आघाडीवर असायचो.या टीममधील महत्वाचा प्रबोधनकार म्हणून दिगंबर घंटेवाट हे काम करायचे. कालांतराने कलापथक बंद पडले, मातंग समाज संघर्ष समितीच्या वतीने एम.आय.डीसी येथे मोठे भव्य मातंग समाजाचे अधिवेशन झाले. त्यात गोविंदराव अदिक हे राज्याचे मंत्रिमंडळातील मंत्रीमहोदय उपस्थित होते. त्या अधिवेशनातही दिगंबर घंटेवाडची महत्वाची भूमिका राहिलेली आहे..त्यानंतरही संघर्ष समितीने अनेक समाज प्रबोधनात्मक कार्य केले .
.त्यानंतरही संघर्ष समितीने अनेक समाज प्रबोधनात्मक कार्य केले, त्यानंतर संघर्ष समितीचे अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीत रूपांतर झाले. त्यादरम्यानही घंटेवाड आणि बाळान्तवाडीकर, वाघमारे आणि इतर यांनी मातंग समाज प्रबोधनाच्या चळवळीचे, अण्णाभाऊंच्या विचाराच्या प्रबोधनात्मक कार्यात ते सक्रिय असायचे. त्यानंतर मात्र घंटेवाड साहेबांनी, स्वतःला प्रकाशन संस्था आणि स्वतः लेखन कार्यात गुंतवून घेतले. दिगंबर घंटेवाड हे अनेक पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी अनेक पुस्तकाचे संपाद नि प्रकाशनही त्यांच्या प्रकाशन संस्थेकडून केले. ते महाराष्ट्रभर अण्णाभाऊ साठे जयंती – स्मृतिदिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती- महापरिनिर्वाण दिन आणि विविध साहित्य संमेलनामध्ये, परिवर्तनवादी पुस्तकाचे स्टॉल म्हणून दिगंबर घंटेवाडच्या पुस्तकाचे स्टॉल असायचेचं .
महाराष्ट्रातील एकही तालुका, एकही साहित्य संमेलन त्यांनी आपल्या हायातीमध्ये चुकवले नाही. दोन वर्षांपूर्वी विद्रोही साहित्य चळवळीच्या वतीने,विद्रोही साहित्य संमेलन, उदगीर येथे संपन्न झाले. त्यापूर्वीच त्यांनी माझ्या दोन पुस्तिका, “फकीराचे तत्वज्ञान” आणि “सुलतान- भीमा -भोमक्या भाकरीचे तत्त्वज्ञान”. ही पुस्तके मागून घेऊन त्यांनी स्टॉलवर विक्रीसाठी ठेवली. अण्णाभाऊंची संपूर्ण शाहिरीचे संकलन, संपादित नि प्रकाशित करून अण्णाभाऊंच्या ग्रंथसंपदेत महत्त्वाची भर टाकली. ते शेवटच्या क्षणापर्यंत परिवर्तनाच्या चळवळीतील पोक्त -वैचारिक आणि तळमळीचे प्रबोधनकार कार्यकर्ते, म्हणून त्यांनी भूमिका बजावली. दिगंबर घंटेवाड यांचे चळवळीतील कार्यकृत्व वगळून चळवळीचा इतिहासच दिला जाऊ शकत नाही. त्यांच्या अचानक जाण्यामुळे एका वैचारिक, तत्त्वनिष्ठ, कार्यकर्ता, लेखक, प्रकाशकला महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळ मुकलेली आहे. त्यांची कृतीशील विचार समाजामध्ये पुन्हा- पुन्हा पेरणे. हेच त्यांना विनम्र श्रद्धांजली ठरणार आहे. दिगंबर घंटेवाड सारख्या त्यागी- समर्पित कार्यकर्त्याला स्मरून आपण सतत कार्यरत राहावे. या अपेक्षासह लेखक दिगंबर घंटेवाड यांच्या स्मृतीला क्रांतिकारी अभिवादन.
प्रा. भगवान वाघमारे,निलंगा. “लसाकम” महाराष्ट्र