फुलवळ च्या शिवारात आढळले साळींदर , शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण..

फुलवळ(धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ येथील रुखमण किशनराव मंगनाळे यांच्या शेत शिवारात साळींदर हा प्राणी आढळून आला असून सध्या सर्वत्र पेरणीपूर्व शेतीची उन्हाळी मशागात चालू आहे तसेच हळद काढणे , शिजवणे तसेच उन्हाळा असल्याने शेतातच अनेकांचे आखाडे असल्याने माणसांबरोबर च पाळीव जनावरे ही शेतातच आहेत. आज ता. १९ मे रोजी सकाळी सकाळी रुखमन मंगनाळे हे असेच कामानिमित्त शेताकडे गेले असता त्यांना त्यांच्याच शेतात साळींदर हा प्राणी आढळून आला त्यावेळी त्यांच्यासोबत सूर्यकांत उर्फ उल्हास लक्ष्मणराव मंगनाळे हे होते , त्या दोघांनी त्या प्राण्याला पाहताच ते भयभीत झाले. त्यांनी ही घटना इतरांना सांगताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साळींदर या प्राण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो शरीराने जरी लहान असला तरी त्याच्या शरीरावर टोकावर , तीक्ष्ण असे काटेरी केस असतात आणि तो त्याच काटेरी केसांच्या साह्याने इतर प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करत असतो. जेंव्हा जेंव्हा त्याच्यावर कोणीतरी हमला करत असल्याची किंवा त्याच्या जवळून जाणाऱ्या कोणाचीही त्याला चाहूल लागते तेंव्हा तो लगेच आपल्या शरीरावर टोकावर काटेरी , तीक्ष्ण असलेल्या केसांना ताठपणे उभे करतो आणि मान , तोंड त्या पंखाखाली घेऊन त्या काटेरी केसांनी पुढच्यावर हमला करतो. ते त्याचे काटेरी , तीक्ष्ण केस हे खूपच विषारी असल्याचे सांगितले जाते.

विशेष बाब म्हणजे जंगलातील वाघ , सिंह व इतर प्राण्यांच्या हमल्यापासून तो स्वतःचे संरक्षण स्वतः करत असतो त्यामुळे अन्य प्राण्यांची तर त्याच्यापुढे कसलीच बिशाद नसते . तेंव्हा आपल्या शिवारात जर असा साळींदर प्राणी आला आणि नजरचुकीने आपण त्याच्या जवळून जात असलो आणि त्याला जर आपल्यावर कोणीतरी हमला करत असल्याची चाहूल लागली तर तो त्या दिशेने काटेरी केसांचा मारा करत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या माऱ्यात माणसाला ही दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वेळीच वनविभागाने याची दखल घेऊन त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी शेतकऱ्यांतुन मागणी होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *