दिल्ली :(धोंडीबा बोरगावे )
केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) मार्फत कलेक्टर (IAS), एस. पी. (IPS) इत्यादी वरिष्ठ पदांसाठी दरवर्षी देशपातळीवर स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परिक्षेचा अंतिम निकाल दि. 23 मे रोजी जाहिर करण्यात आला. या परिक्षेत आयएएस दिल्ली इन्स्टिट्यूट (IDI) या दिल्लीस्थित नामांकीत संस्थेने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही घवघवीत यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
ह्या वर्षी आयएएस दिल्ली इन्स्टिट्यूट (IDI) या संस्थेचे एकूण 39 विद्यार्थी मुलाखती साठी पात्र झालेले होते. त्यापैकी 21 विद्यार्थी या अतिशय कठीण अशा स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.विशेष बाब म्हणजे या पैकी ६ विद्यार्थी हे महाराष्ट्राचे आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधे आदित्य शर्मा( गुणवत्ता क्रमांक 70), कुणाल अग्रवाल(247), कोमल अग्रवाल (303), सी. विनोथीनी (360) इत्यादींचा समावेश आहे. आदित्य शर्मा यांनी पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 24 व्या वर्षी IAS होण्याचा मान पटकावला आहे.
महाराष्ट्रातून अभिषेक दुधाळ (278), शशीकांत नरवडे (493), अमित उंदीरवडे (581), अनुराग घुगे (624), शिवहर मोरे (693), अतुल ढाकणे (767) यांनी संस्थेच्या मार्गदर्शाना खाली परिक्षेत यश मिळवले.
आयएएस दिल्ली इन्स्टिट्यूट (IDI) चे संचालक श्री गजानन वडजे सर (मो. 85279 65204) व श्री आदेश मुळे सर (मो. 95550 98967) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. या नव्याने अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे श्री गजानन वडजे सर हे मुळचे नांदेडचे असून गेल्या 10 वर्षांपासून दिल्ली मधे UPSC ची तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
आयएएस दिल्ली इन्स्टिट्यूट (www.iasdelhi.org) ही दिल्ली येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करते. ही अग्रगण्य संस्था महाराष्ट्रातून दिल्ली येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचं हक्काचं ठिकाण म्हणून ओळखली जाते. मराठी माणसां व्दारे स्थापित व संचालीत अशी दिल्लीतील UPSC तयारी साठीची एकमेव संस्था आहे. या निकालामुळे सर्वत्र इन्स्टिट्यूटचे कौतुक होत आहे.