सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयातील नवीन प्रसूतिगृह लोकार्पण ; डॉ.सुर्यकांत लोणीकरांनी गरोदर मातेसाठी केली उत्कृष्ट सोय

 

कंधार ; ( प्रतिनिधी शंकर तेलंग )

दि:-२४/०५/२३ रोजी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे “राष्ट्रीय आरोग्य अभियान” महाराष्ट्र शासन अंतर्गत पायाभूत सुविधा विकास कक्ष मार्फत प्रसूतिगृह विस्तारीकरण बांधकाम नवीन इमारतीचे उदघाटन सकाळी ठिक ११:३५ वा झाले.
आमदार प्रतिनिधी तथा शेकाप महीला प्रदेशाध्यक्षा र्सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

 

यावेळी सौ.आशाताई शिंदे यांनी मार्गदर्शन करताना बाळांतपण म्हणजे महिलांचा दुसरा जन्म आहे महिलांना आपली काळजी घ्यावी , महिलांनी आपली प्रसुती शासकीय रुग्णालयातच करावी असे आवाहन केले .

 

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.राजू टोम्पे डॉ.महेश पोकले,यांचं स्वागत करण्यात आले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांचे व सर्व टीमचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी प्रास्ताविक करताना नवीन इमारतीमध्ये महिलांना वेगळ प्रसूतिगृह असल्यामुळे स्त्रीला काही काळजी करण्याची  गरन नाही ,महिलांना वेगळा कक्ष केल्यामुळे महिलां सुरक्षित राहणार आहे.. जनतेने त्यांचा फायदा करून घ्यावा असे आवाहन डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी केले आहे. या कक्षामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आधीपरिचारिका व इतर कर्मचारी २४ तास सेवा देणार आहेत. प्रसुतीच काम जिल्ह्यात एक नंबर वर आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया एक नंबर वर अणि सिझेरियनशस्त्रक्रियाची सोय पण उपलब्ध केली आहे.

तसेच कोविड लसीकरणाचे काम जिल्ह्यात एक नंबर वर ठेवले आहे.डॉ.सुर्यकांत लोणीकर हे सेवानिवृत्त होत असल्याने पोकळी निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. नवीन इमारतीचा गोरगरीब रुग्णांना लाभ होणार आहे. सर्व जनतेने अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले .

कायक्रमांस प्रमुख पाहुणे सुधाकरआण्णा कांबळे (माजी उपनगराध्यक्ष),मन्नान चौधरी (माजी उपनगराध्यक्ष),
शेरूभाई (अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष शे. का. प. )
,नवनाथ बनसोडे, कचरू बंडेवाड,गिरीश डिगोळे वसंत मंगनाळे ( सर्कल प्रमुख शेकाप) विलास गजभारे, एजाज भोसीकर, सद्दाम भाई, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजू टोम्पे मनःले की राष्ट्रीय आरोग्य अभियान (NRHM) हे २००५ साला पासुन सुरवात झाली तेव्हापासून स्त्री मृत्यू दर कमि झाला आहे केरळच्या राज्याच्या नंतर महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो,आम्ही तो कमी करू…अणि नवीन इमारतीमध्ये चांगली कामगिरी करू..सो.आशाताई शिंदे मॅडमनी डॉ.राजू टोम्पे यांच्या कामाचे कौतुक केले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले,ज्ञानेश्वर केंद्रे, स्मिता शेंबाळे ,श्रीकांत मोरे,शाहीन बेगम,उजमा तबसूम,नम्रता ढोणे, प्रज्वला बंडेवार निखहत फातेमा, उपस्थित सर्व कर्मचारी ज्ञानेश्वर बगाडे, शितल कदम (अधिपरिचारिका),शिल्पा केळकर,अश्विनी जाभाडे,पल्लवी, दिलीप कांबळे,विष्णुकुमार केंद्रे,प्रशांत कुमठेकर,अशोक दूरपडे,गुंडेराव बोइनवाड,राहुल, इत्यादी सर्व ग्रामीण रुग्णालयातील उपस्थित अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार मोहम्मद सिकंदर, सय्यद हबीब ,माधव गोटमवाड,मारुती चिलपिंपरे, दयानंद कदम ,सुभाष वाघमारे इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *