आपल्या भारतात पूर्वीपासून लिहिण्यासाठी,बोरु,टाक,फाऊंटन पेन आणि बाॅलपेन असा प्रवास झाला.पण हल्ली इंग्लिश मीडियम स्कूलचे पेव वाजल्यापासून पेन्सिलने लिहितांना चुक झाल्यास इरेजरने खोडता येते.म्हणून त्या माध्यमाचा विद्यार्थी परीक्षा असो का क्लासवर्क वा होमवर्क करतांना इरेजर जवळ घेतल्याशिवाय त्यांना लिहिता येत नाहीच!कारण सांगतात लिहिलेली नोटबुक इरेज करुन वापरता येते.मला सांगा किती पालकांनी आपल्या इंग्लिश स्कूल मधील पाल्यास इरेज करुन वही लिहिण्यासाठी दिली?
पेन्सिल माध्यमाचा वापर लिहितांना केल्यास आत्मविश्वास रसातळाला जातो.म्हणून क्रांतिभुवन बहाद्दरपुरच्या कविराज गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजींनी कंधारी आग्याबोंड सदरात शब्दासुड ओढले आहे.
उद्या दि.२३ मे २०१९ पासून वीर शिरोमणी या दैनिकात नित्याने पहिल्या पानावर दररोज प्रकाशित करण्याचा निर्णय आदरणीय संपादक मंडळाने निर्णय घेतल्या बद्दल त्यांचे आभाराभिनंदन!