कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आली होती त्याचा निकाल दि .२५ मे रोजी जाहीर झाला त्यात कु आभा दिगांबर वाघमारे हिने सुमारे ५३९ गुण घेत शेकडा ९० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले .
नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी विद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले .
विद्यालया चा विज्ञान शाखेचा- 96.61 टक्के निकाल लागला असून विशेष प्राविण्यात 179 विद्यार्थी. . प्रथम श्रेणीत 166 विद्यार्थी. ।द्वितीय श्रेणीत -29विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत,कला शाखेचा 81.48% निकाल लागला,
असून विशेष प्राविण्य श्रेणीत 03 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 77 व द्वितीय श्रेणीत -30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले,
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अध्यक्ष व संस्थापक मा. आ. ईश्वररावजी भोसीकर ,प्राचार्य मा. राजेंद्रजी भोसीकर ,उपमुख्याध्यापक म. फेसलोद्दीन , शालेय समितीचे अध्यक्ष तथा युवा नेते महेश भाऊ भोसीकर यांच्यासह सर्व प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.