कंधार : दि. 25 ता. प्र.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजलीताई प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या विक्की गार्डन नांदेड रोड लोहा येथे वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड दक्षिण आयोजित दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर आल्या होत्या.
या कार्यक्रमाच्या समारोपानंतर दि. 24 मे रोजी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांच्या कंधार येथील निवासस्थानी परिवाराची सदिच्छा भेट घेत त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.यावेळी नरंगले परिवारासह पदाधिकारी यांच्याकडून प्रा.अंजलीताई आंबेडकर यांचा खारीक खोबऱ्याच्या हाराने यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.
तसेच वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजलीताई प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर,राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांच्या हस्ते शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंधारच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांचा शाल,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे,जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले,महासचिव श्याम कांबळे,युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धीरज हाक्के, वंचित बहुजन आघाडीचे कंधार तालुकाध्यक्ष संतोष पाटील गवारे, महिला आघाडीचे तालुकाध्यक्षा साधना एंगडे,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास अण्णा कांबळे,सरचिटणीस एन.एन.कांबळे,कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे,शहराध्यक्ष निलेश गायकवाड, वंचितचे महासचिव प्रेमानंद गायकवाड,शहराध्यक्ष मोसिनभाई बागवान,महासचिव बबन जोंधळे,सहसचिव चंद्रशेखर गायकवाड, भास्कर कदम,अविनाश कांबळे,सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे,सी.डी.कांबळे, आर.एन.गायकवाड, बी.सी.कांबळे, नाना गायकवाड,पत्रकार नामदेव जाभाडे,सुदाम मोडक यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.