कंधार : प्रतिनिधी
लातूर बोर्डाकडून यावर्षी घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात आला. कंधार तालुक्यातुन १२ विच्या परीक्षेला बसलेल्या ४ हजार ५९६ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार १०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा सरासरी निकाल ८९.३६ टक्के लागला आहे.
तालुक्यातील शाळा आणि त्यांची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. श्री शिवाजी कॉलेज, कंधार(९१.१९), मनोविकास नंदकुमार दत्तात्रय बिडवई, कंधार(८९.२४), श्री शिवाजी उर्दू कॉलेज, कंधार(८८.०७), प्रियदर्शिनी कन्या शाळा, कंधार (९१.१७), श्री शिवाजी हायस्कुल, कुरुळा (९३.२२), माणिकप्रभू माध्यमिक विद्यालय, अंबुलगा(९९.२७), श्री शिवाजी कॉलेज, बारुळ(८५.८४), महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, शेकापूर(८८.४१), पोस्ट बेसिक आश्रम, गांधीनगर (९६.६१), नेताजी सुभाषचंद्र बोस, पानभोसी (९२.१९), श्री शिवाजी उच्च माध्यमिक, हाळदा (९०.४४), समता ज्युनियर कॉलेज, उस्मानगर(८९.७६), गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक, चिखली (९३.४३), शांतिदूत गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक, गोणार (९६.९९), भीमाशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, शिरढोण(९१.३१), श्री शिवाजी हायस्कुल, दिग्रस बु. (९०.७५), संत नामदेव महाराज महाविद्यालय उमरज (९०.१९), संत नामदेव महाराज महाविद्यालय, पेठवडज (९५.२३), महात्मा गांधी महाविद्यालय, बाचोटी(९४.६९), कै.गणेशराव पाटील माध्यमिक विद्यालय, नारनाळी (९४.२५), लाल बहाद्दूरशास्त्री माध्यमिक विद्यालय, संगूचीवाडी(९५.२१), साईनाथ विठ्ठलनाथ उच्च माध्यमिक विद्यालय, मंगलसंगावी (७३.८७), श्री बालाजी उच्च माध्यमिक, बोरी(बु) (९४.७३), रामकृष्ण माध्यमिक आश्रम शाळा, गांधीनगर (९४.११), माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, नेहरूनगर नागलगाव(८१.०८), यशवंतराव चव्हाण उच्च माध्यमिक, गुंटूर (८८.८८), सुभाषराव पाटील उच्च माध्यमिक, कळका (९०.२४), कै.देशमुख ज्युनियर कॉलेज, कौठा(९७.१६), श्री विद्यासागर उच्च माध्यमिक, कंधार(३४.३१), ग्रामीण ज्युनियर कॉलेज, नेहरूनगर(८३.३३) लागला आहे.