नांदेड ; प्रतिनिधी
काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं आणि दोन दिवसांत त्यांच्या निधनाचे वृत्त येणं, हे सारं अकल्पनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. राजकीय कारकिर्द बहरास येत असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं आहे.
खा. बाळूभाऊ धानोरकर आमचे एक सक्षम, उर्जावान सहकारी होते, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व सतत कार्यमग्न असे लोकप्रतिनिधी होते. जमिनीशी नाळ जुळलेले, दांडगा जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या चेहर्यावर सदोदित दिसणारे हास्य, आपुलकीने बोलणं नेहमी स्मरणात राहिल.
खा. बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. या दुःखद क्षणी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.