फूलवळ ;( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे दिनांक ३१ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच विमलबाई मंगनाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मंगनाळे , सदस्य प्रतिनिधी रहीम शेख, मनोहर जाधव माजी सरपंच बालाजी देवकांबळे, पत्रकार दिगंबर डांगे व परमेश्वर डांगे सह गावातील महिला , पुरुष नागरिक उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या आदेशानुसार जयंतीच्या दिवशी गावातील सामाजिक राजकीय किंवा इतर क्षेत्रांमध्ये उलेखनिय कार्य करणाऱ्या दोन महिलांची निवड करून त्यांचा सन्मान करण्याचे आदेश ग्रामपंचायतला दिले आहेत.
त्यावरून स्वयंसहायता महिला समूह गटाच्या आय. सी .आर . पी. सौ. जयमला डांगे व सौ. संध्या मंगनाळे या दोन महिलांची पुरस्कारासाठी निवड करून त्यांचा ग्रामपंचायत च्या सरपंच विमलबाई मंगनाळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी सेविकासेविका वंदना होनराव, जयश्री डांगे, पार्वती सोमासे, नुलोफर शेख, ताहेराबी शेख, साकेरा, सुवर्णा मंगनाळे यांच्यासह उमेद अभियान बचत गटाच्या सर्व महिलांची विशेष उपस्थिती होती.