वृध्द दिव्यांग निराधारांची गैरसोय टाळण्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्यास 30 जुन पर्यंत मुदतवाढ- परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसिलदार कंधार अनुपसिंह यादव

 

 

कंधार ; प्रतिनिधी

वातावरणातील बदल व वृध्द दिव्यांग निराधारांची गैरसोय टाळण्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपपत्र सादर करण्यासाठी 30 जुनपर्यत एक महीन्याची मुदतवाढ- परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसिलदार कंधार अनुपसिंह यादव यांनी दिली .

 

विशेष सहाय्य योजनेतील संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ,इंदीरा गांधी वृध्दापकाळ योजना लाभ ‍मिळत असलेल्या लाभार्थीकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर उत्पन्नाचा दाखला घेणे सक्तीचे राहीन अशी तरतुद महाराष्ट्र शासन निर्णय क्र.विसयो 2018/प्रक्र.62/विसयो दि.20/08/2019 मध्ये केलेली आहे.यानुसार राज्यभरात तहसिल कार्यालयाकडून लाभार्थीकडून हयात व उत्पन्नाचे प्रमाणपत्र संकलीत करण्याचे काम चालु आहे.

परंतु संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, इंदीरा गांधी वृध्दापकाळ योजना लाभ ‍मिळत असलेल्या लाभार्थीना वातावरणातील बदल ऊनाची तिव्रता, इ. मुळे व उत्पन्नाचे प्रमाणपत्रासाठी आँनलाईनमध्ये सर्व्हरवर येत असलेला लोड, लाभार्थीची होत असलेली परेशानी टाळण्यासाठी परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसिलदार कंधार अनुपसिंह यादव यांनी उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 30 जुनं 2023 पर्यंत एक महीन्याची मुदतवाढ दिली आहे. तसेच लाभार्थीना तहसिल कार्यालयात उत्पन्नाचे प्रमाणपत्र येऊन देण्याची आवश्यकता नाही आपल्या गावच्या तलाठीकडे सादर करता येईल. उत्पन्नाचे प्रमाणपत्र तलाठी सज्जावरच संकलीत करण्याच्या सुचना सर्व तलाठी यांना दिलेल्या असून खरे पात्र उत्पन्नात वाढ न झालेल्या दिव्यांग, वृध्द, विधवा इ. ना तात्काळ नियमानुसार उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रमाणपत्र शाखेला व महाईसेवाकेंद्र व उत्पन्नाचे प्रमाणात्रासाठी आवश्यक पडताळणी करणा-या यंत्रणेला सक्त सुचना दिलेल्या आहे.

 

संजय गांधी विभागाचे पेशकार माधव पवार संगांयो शाखेचे बारकुजी मोरे (म.स), सुरेश वंजे यांना ‍नियमानुसार कार्यवाही,करण्याच्या व लाभार्थीना मार्गदर्शन करण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच प्रमाणपत्र शाखेचे श्री वाघमोडे यांना आवश्यक ती कागदपत्रे तपासून नियमानुसार लवकरात लवकर प्रमाणपत्रे देण्यात यावीत. महाईसेवा केंद्रांनी विनाकारण लाभार्थीना परेशान करु नये. लाभार्थीनी तालुक्याच्या ठिकाणी न येता गावाजवळील महाईसेवाकेंद्रात कागदपत्रे सादर करुन उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून घ्यावे व गावात नेमलेल्या तलाठीकडेच दयावे. तसेच लाभार्थीनी घाबरुन न जाता या पुढील महीन्यात सावकाश पणे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावीत या महीन्यात यामुळे कोणाचाही लाभ बंद करण्यात येणार नाही. तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबतची बाब शासन स्तरावरील असल्याने तहसिलस्तरावर रद्द करणे शक्य नाही. दरवर्षी उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबतची अट रद्द करण्याच्या लाभार्थी,लोकप्रतिनीधी,पत्रकार यांच्या मागणी विनंती बाबत शासनाला पत्राद्वारे कळवीले आहे सादर केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *