डॉ.राजु टोम्पे कंधार ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून रूजू

 

प्रतिनिधी ;कंधार

येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर हे नियत वयोमानानुसार बुधवार दि.३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे कंधार ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ.राजु नागोराव टोम्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.राजु टोम्पे यांनी बुधवार दि.३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कंधार ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.
डॉ.राजु टोम्पे हे ग्रामीण रुग्णालय, कंधार येथे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. डॉ.राजु टोम्पे हे मूळचे मौजे मंगनाळीचे (ता.कंधार जि.नांदेड) आहेत. त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद व डीजीओ (स्त्रीरोग तज्ज्ञ) शिक्षण जिल्हा स्त्रीरोग रुग्णालय, अकोला येथे झालेले आहे. किनवट येथे दोन वर्षे तालुका आरोग्य अधिकारी पदावर काम केले आहे. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, फुलसांगवी (ता.महागाव जि. यवतमाळ), प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरटा (उमरखेड, जि.यवतमाळ), प्राथमिक आरोग्य केंद्र, राजगड (ता.किनवट जि.नांदेड) आदी ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली आहे. आतापर्यंत त्यांनी ७६० महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, ५३२ महिलांची प्रसूती व २४ महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया केली आहे.
यावेळी सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर, डॉ.महेश पोकले, डॉ.ज्ञानेश्वर केंद्रे, डॉ.संतोष पदमवार, डॉ.शाहीन बेगम, डॉ.उजमा तबसुम, डॉ.नम्रता ढोणे, डॉ.अरुणकुमार राठोड, कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर बगाडे, पत्रकार तथा स्वच्छतादूत राजेश्‍वर कांबळे, अधिपरिचरिका शितल कदम, राजश्री इनामदार, शिल्पा केळकर, आऊबाई भुरके, अधिपरिचारक विष्णुकुमार केंद्रे, प्रशांत कुमठेकर, परिचारिका अनिता तेलंग, ज्योती तेलंगे, सुनीता वाघमारे, प्रियंका गलांडे, सुरेखा मैलारे, औषध निर्माण अधिकारी दिलीप कांबळे, शंकर चिवडे, एक्स-रे तंत्रज्ञ विठ्ठल धोंडगे, प्रयोग शाळा तंत्रज्ञ सचिन ठाकूर, शंकर चव्हाण, आयसीटीसी समुपदेशक राजेंद्र वाघमारे, प्रदीपकुमार पांचाळ, आशिष भोळे, अरविंद वाठोरे, कोंडाआप्पा स्वामी, अशोक दुरपडे, गुंडेराव बोईनवाड, राहुल गायकवाड आदींसह आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *