लग्नकार्य आणि लोकांची मानसिकता.

आताच दोन दिवसापूर्वी जवळच्या नात्यात लग्न होतं.. लग्न लागल्यावर आम्ही जेवायला बसलो.. माझ्या शेजारी साधारणपणे १० ते १२ वर्षाच्या दोन मुली एकमेकांशी बोलत होत्या.. एक म्हणाली , I remember , 6 months ago we had here.. I dont remember exact function..but I remember food..त्यावर मी म्हटलं साखरपुडा होता .. त्यावर ती म्हणाली , what was that ?? मी म्हटलं , तुमच्या भाषेत त्याला Engagrment म्हणतात .त्यावर दुसरी म्हणाली , forget it Food is important , not function..तितक्यात तिची आई तिथे आली , ती म्हणाली , काय गप्पा सुरु आहेत गं ?? .. जेवा लवकर.. तिची मुलगी म्हणाली., I am full .. मला तिच्या आईकडुन अपेक्षीत होतं की ,ती म्हणेल ताटात टाकायचं नाही किवा मी उरलेलं अन्न मी घेइन असं काहीसं.. तिने त्या मुलीला ताट उचलुन ड्रम मधे ठेवायला सांगितलं.. अर्ध ताट अन्न वाया गेलं .. पाहुन फार वाईट वाटलं ज्याने ताटाच्या हिशोबाने पैसे खर्च केले , त्यासाठी मेहनत केली आणि अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्याचं काय ??..
दुसऱ्या स्त्री ने तिच्या नवऱ्यासाठी इतकं ताट भरुन आणलं होतं की ताट overflow झालं होतं त्यावर बिचारा नवरा म्हणाला , अगं इतकं कशाला आणलस ?? .. त्यावर ती म्हणाली , पुन्हा रांगेत जायला नको आणि पोटभर जेवुन घ्या मी रात्री काहीही करणार नाही..म्हणजेच काय तर दुपारचं आणि रात्रीचं दोन्ही वेळचं जेवा. तरी नशीब आहेर आणु नका असं लिहीलं होतं नाहीतर आहेराची वसुली म्हणुन लोकानी चार वेळचे जेवुन घेतले असते.. फुकट मिळालं की रात्री १० वाजता पण दाबुन जेवायचं .. वजन वाढलं तरी वाढुदेत ..
मधे मित्राच्या घराच्या वास्तुशातीला गेले होते.. त्यानेही भेटवस्तु आणु नये असं लिहीलं होतं.. मला कोणाकडेही हात हालवत जायला आवडत नाही म्हणून मित्राला म्हटलं , गिफ्ट घेउ रे काहीतरी.. त्यावर तो म्हणाला ,अगं तो नको म्हणालाय ना मग कशाला ??.. तिथे गेल्यावर त्याला गुलाबजामुनच्या २ वाट्या खाताना पाहिलं आणि अशा मानसिकतेची किव आली..
लग्नाला किवा कार्यक्रमाला बोलावणाऱ्याचा हेतु शुद्ध असतो ,,त्याला वाटतं , लोकांनी यावं , त्यानिमित्ताने सगळे भेटतात.. त्यासाठी तो खर्चाचा विचार करत नाही पण लग्नाला किवा कार्यक्रमाला येणारे बरेचसे हे फुकट खायला मिळतं म्हणून येतात.. कटु आहे पण सत्य आहे.. निदान आजूबाजूचे काय म्हणतील किवा आपलं वागणं ,बोलणं योग्य आहे का याचाही विचार करायला हवा.. बदलत चाललेली मानसिकता ही बऱ्याचदा किळसवाणी वाटते .. घरात हे इतकं जेवत असतील का ?? .. हा प्रश्न मला कायम पडतो..
तुम्हाला काय वाटतं ??

 

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *